Shadashtak Yog 2026 : ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची हालचाल आणि त्यांचे परस्पर संयोग यांचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. 16 जुलै 2026 पासून ‘षडाष्टक योग’ (Shadashtak Yog) नावाची एक विशेष खगोलीय स्थिती निर्माण झाली आहे. सूर्य आणि राहू यांच्यात निर्माण झालेल्या या अशुभ योगाचा प्रभाव पुढील 30 दिवस म्हणजेच 17 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या सहाव्या आणि आठव्या घरात स्थित होतात तेव्हा ‘षडाष्टक योग’ निर्माण होतो. ही स्थिती अनेकदा परस्पर मतभेद, तणाव आणि अनपेक्षित आव्हानांचे संकेत देते. यावेळी, सूर्य आणि राहूची ही युती चार विशिष्ट राशींच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे.
‘या’ 4 राशींच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे :
वृषभ रास (Taurus Horoscope)
कामाच्या ठिकाणी बॉस आणि उच्च अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. तुमच्या वाणीत कठोरपणा येऊ देऊ नका. तसेच, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना घाईगडबड करु नका.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी करिअरमध्ये स्थिरतेसाठी धैर्य आणि साहसाने काम करणं गरजेचं आहे. या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, कोणताही मोठा निर्णय घेताना आधी त्याची नीट पडताळणी करुन घ्या. अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, तुमच्या वाणीत कठोरता जाणवू शकते. तसेच, अचानक कामाचा वाढता ताण तुम्हाला जाणवू शकतो. वादविवादापासून दूर राहा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढचे 30 दिवस कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, मानसिक शांतीसाठी नियमित योग आणि ध्यान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा चांगला असणार की वाईट? कोणत्या राशींना धनलाभाचे संकेत? साप्ताहिक राशीभविष्य