‘सीता के पती, नीता के पती’ वक्तव्यावरून कुणाल कामरावर टीकेची झोड; सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची नोटीस; नेमका वाद काय?


Kunal Kamra: नीट पेपरफुटी (NEET Paper Leak) प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर  सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) उपोषण करत आहेत. देशभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने प्रश्न उपस्थित होते. दरम्यान, उपोषणाच्या 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात आलं. कारवाईनंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ उडाल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास जंतरमंतरवर आलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला ‘सीता के पती, निता के पती’ वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने नोटीस बजावली आहे. ‘देव ही पवित्र भावना आहे. आमच्या देवाचं नाव बदनाम करायचं नाही. देवाचा अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही’, असं म्हणत माफी मागावी आणि ते वक्तव्य सोशल मीडिया वरून काढून टाकावं असं या नोटिशीत म्हंटल आहे. स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरही टीकेची झोड उठवली आहे.

नेमका वाद काय ?

कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर येथील आंदोलनानंतर पर्यावरण व शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता. नीट पेपरफुटीनंतरच्या गोंधळानंतर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. 28 जून पासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा जंतर-मंतरला पोहोचला होता. त्यावेळी त्याने सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत सरकारवर हल्लाबोल केला होता. आधी ‘सोनम वांगचुक यांच्या रूपाने आपल्या देशातील आणखी एक गांधी उपोषणाला बसले आहेत.गोडसे वादी लोकांना काही फरक पडत नाही,त्यांना कसली चिंता नाही.’या वक्तव्यावरही टीका झाली होती. आता ‘हे सीता के पती का नाम ले रहे है,अर्निता के पति का काम कर रहे है’या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने कुणाल कामराच्या या वक्तव्यावरून त्याला नोटीस बजावली आहे. कुणाल कामराने हा व्हिडिओ डिलीट करावा आणि तातडीने माफी मागावी अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे. हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं या नोटिशीत म्हटलं आहे. 

कुणाल कामरा नेमकं काय म्हणाला?

कुणाल कामरा म्हणाला “मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, तुम्हाला जर कुणी मोदी समर्थक किंवा भाजपाचा मतदार भेटला तर त्याच्याशी अगदी सहजपणे बोला, वाद घालू नका. आपल्याला रोग्याचा नाही तर रोगाचा इलाज करायचा आहे. मोदींनी केलं तर योग्य केलं, असं ते म्हणत असतील तर तुमचा वेळ वाया घालवू नका. तिथून निघून जा. या सरकारला कसलीच लाज वाटत नाही. सोनम वांगचुक यांच्या रुपाने आपल्या देशातले आणखी एक गांधी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. गोडसेवादी लोकांना काही फरक पडत नाही, त्यांना कसली चिंताच नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, काही शेतकरी आहेत, काही बेरोजगार आहेत. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने भारताच्या सरन्यायाधीशांचे आभार मानतो कारण त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यासाठीची पहिली वीट ठेवली.

“ये सीता के पती का नाम ले रहें है और नीता के पती का काम कर रहे हैं.” असंही तो पुढे म्हणाला होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *