Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, ‘माझ्या संमतीशिवाय….


Sonam Wangchuk wife Gitanjali J Angmo: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk)यांना जंतर मंतरवरून (Jantar Mantar) खाली उतरवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे. आंगमो (Gitanjali J Angmo) यादेखील सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) पोहोचल्या आहेत. यासर्व घडामोडींवर गीतांजली यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलीय, त्यात त्या म्हणाल्या कि, ‘मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आले आहे. माझ्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा नसवाटे (इंट्रावीनस) कोणतेही औषध किंवा पदार्थ देऊ नये.” अशी पहिली प्रतिक्रिया पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी दिली आहे. (Sonam Wangchuk wife Gitanjali J Angmo)

 

Gitanjali J Angmo: कालपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती आणि त्यांना रुग्णालयात आणण्याची गरज नव्हती

 

दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी (18 जुलै) पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे. आता त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी या प्रकरणी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयातील दाखल करण्यासंदर्भात, त्या म्हणाल्या की शुक्रवारी त्यांची प्रकृती ठीक दिसत होती. गीतांजली आंगमो यांनी पुढे सांगितले की, कालपर्यंत त्यांची प्रकृती ठीक होती आणि त्यांना रुग्णालयात आणण्याची गरज नव्हती. वांगचुक यांच्या पत्नी, आंगमो यांनी सांगितले की, कलम 32 अन्वये हा त्यांचा अधिकार आहे की, त्यांच्या आणि त्यांच्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट दिली जाऊ शकत नाही.

दुसरीकडे, दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले. समर्थकांसह आलेल्या दीपके यांनी शनिवारी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली. तसेच, या आंदोलनाच्या समर्थनार्थ 20 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईवर दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?

सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतर इथे ही कारवाई केली. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन, न्यायालयानं यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचं, तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *