Last Updated:
Sonam Wangchuk taking away hospital forcefully : बेमुदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आहे. जंतर-मंतरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Abhijeet Dipke First reaction On Sonam Wangchuk : गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून उचलून घेऊन गेल्याचं समोर आलं आहे. उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचं पोलिसांचं म्हणणं असून आला. कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मोठी माहिती दिली आहे.
I have been beaten up and put under detention by Delhi Police
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 18, 2026
बेमुदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस जंतर-मंतरवर कठोर कारवाई करत आहेत. ते लोकांना मारहाण करत आहेत आणि सोनम सर यांना बळजबरीने घेऊन जात आहेत, असं अभिजीत दीपके सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कारवाईवर संताप देखील व्यक्त केलाय. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आहे आणि ताब्यात घेतले आहे, असंही अभिजीत दीपके यांनी म्हटलंय.
Delhi Police is cracking down at Jantar Mantar. Beating up people and taking away Sonam sir forcefully
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 18, 2026
डॉक्टरांनी दिलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार, सोनम वांगचूक यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली असून त्यांचं वजन नऊ किलोंनी घटलेलं आहे. सोनम वांगचुकची प्रकृती खालावल्यानंतर शनिवारी जंतर मंतर आणि त्याभोवती आणि नवी दिल्ली जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली, असे पोलिसांनी सांगितलं.
#WATCH | Delhi: Activist Sonam Wangchuk, who was sitting on a hunger strike from last 20 days at Jantar Mantar, taken to the hospital by the police.
More details awaited. pic.twitter.com/81DTO3cyh4— ANI (@ANI) July 18, 2026
‘आंदोलकांशी संवाद साधण्यास नकार देणारे हे सरकार केवळ बेजबाबदारच नाही, तर अत्यंत क्रूर आहे,’ अशा शब्दांत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला होता. “उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्यांची प्रकृती व वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन, सोनम वांगचुक यांना योग्य अशा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.”, नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी म्हटलं आहे.
Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी राडा! पोलिसांनी जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये का नेलं? अभिजीत दीपके ताब्यात, काय घडलं?
