Last Updated:
कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस सुरू होत नाही तेच दोन्ही शहरामध्ये बत्तीगुल झाली आहे.
कल्याण : ४८ तासांमध्ये मीटर बसवले जाणार, असं म्हणत बळजबरीने स्मार्ट मिटर बसवण्यासाठी पुढे असलेल्या महावितरणकडून नीट शहरांना वीज सुद्धा पुरवली जात नाही. थोड्या पाऊस पडला नाही तेच कल्याण आणि डोंंबिवलीमधील ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत होत आहे. आताही कल्याण डोंबिवली शहरामध्ये बत्तीगुल झाली आहे.
आठवड्याभराची विश्रांती घेतल्यानंतर कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस सुरू होत नाही तेच दोन्ही शहरामध्ये बत्तीगुल झाली आहे. दोन्ही शहरात ऐन संध्याकाळी अंधारामय वातावरण निर्माण झालं.
– कल्याण आणि डोंबिवली शहराची बत्तीगुल, दोन्ही शहरात अंधारामय वातावरण pic.twitter.com/boVKhPVHsM
— News18 Marathi (@News18_marathi) July 17, 2026
पडद्या मधून येणारे आणि पाल सबस्टेशन ला विद्युत पुरवठा करणारे अतिउच्च दाब वाहिनी ट्रिप झाल्यामुळे कल्याण डोंबिवली शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
महापारेषण कडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती महापारेषण विभागाने दिली आहे.
महापारेषांच्या भिवंडी पडगा पाल लाईनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल ४ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील दोन लाख उल्हासनगर मधील सव्वा लाख तर बदलापूर शहरातील २५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनचे पेट्रोलिंग करण्याचे काम सुरू असून वीजपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यासाठी महापारेषणचे प्रयत्न सुरू आहेत.
महापारेषण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या २२० केव्ही पडघा-पाल वीजवाहिनीमध्ये संध्याकाळी ७.४५ वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे आनंदनगर, पलावा, पाल आणि डोंबिवली या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला असून, सुमारे ३०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. याचा फटका बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील सुमारे ४ लाख २० हजार ग्राहकांना बसला असून या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
महापारेषण कंपनीचे पथक पडघा ते पाल उपकेंद्रादरम्यान झालेला हा तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी आणि तो दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून आले आहे.
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
Dombivali: कल्याण-डोंबिवलीमध्ये बत्तीगुल, संध्याकाळी शहरामध्ये किर्रर्र अंधार, हे कारण आलं समोर
