चंद्रपूर : पोलिसांच्या कार्यक्षमतेचं जसं कौतुक होत असतं, तसंच पोलिसांवर (Police) अनेकदा गंभीर आरोपही केले जातात. तक्रारादाराकडून पैशांची मागणी करणे किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तक्रारही पोलिसांविरुद्ध केली जाते. मात्र, चंद्रपुरात (Chandrapur) चक्क सराईत गुन्हेगारानेच पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर, विष पिऊन त्याने आपलं जीवनही संपवलं. गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगार दिलीप यादव याने चंद्रपूर सिटी पोलीस ठाण्याच्या आवारात घेतले विष प्यायले होते. मात्र, उपचारादरम्यान दिलीप यादव यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दिलीप यादव याने विष घेतल्याचे लक्षात आल्यावर तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात केले दाखल केले होते. येते अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान या गांजा विक्रेत्या दिलीप यादवचा (44) मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. माझी कुठलीही चूक नसताना मला सिटी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले आहे.
शहरातील बाबूपेठ परिसरात चार दिवसांपूर्वी गांजा विक्री प्रकरणी सिटी पोलिसांनी धाड टाकली होती, या धाडीतील आरोपीने दिलीप यादवकडून गांजा विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली होती, त्यावरून दिलीप यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले. मात्र, आज तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचताच त्याने विष प्यायल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा तणाव पसरला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
पोलिसांचाही चौकशी करू – नोपाणी
मृतक व्यक्ती आधीच विष घेऊन आला होता, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. आता, त्या आधारावर आम्ही तपास करू, मृतकावर याआधी काही गुन्हे दाखल आहेत, सोबतच मृतकाने मृत्यूपूर्व जो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे घेतली आहे त्याबाबत देखील पोलीस तपास करेल, असे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांनी म्हटले.
हेही वाचा
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर