सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन, क्रिकेट जगतातला पहिला महान ऑलराऊंडर काळाच्या पडद्याआड | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून ज्यांनी ओळख कमावली त्या सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी वेस्ट इंडिजचे महान ऑलराऊंडर सर गारफिल्ड सोबर्स यांनी अखेरचा श्वास घेतला.

सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन, क्रिकेट जगतातला पहिला महान ऑलराऊंडर काळाच्या पडद्याआड
सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन, क्रिकेट जगतातला पहिला महान ऑलराऊंडर काळाच्या पडद्याआड

मुंबई : क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून ज्यांनी ओळख कमावली त्या सर गारफिल्ड सोबर्स यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी वेस्ट इंडिजचे महान ऑलराऊंडर सर गारफिल्ड सोबर्स यांनी अखेरचा श्वास घेतला. 28 जुलैला सोबर्स 90 वर्षांचे झाले असते. क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडियावर पोस्ट करून सर गारफिल्ड सोबर्स यांच्या निधनाची दुख:द बातमी दिली.

सोबर्स यंना क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात संपूर्ण खेळाडू मानलं जातं. सोबर्स यांनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये अशी उंची गाठली की आजपर्यंत कुणालाच तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. सोबर्स अशा काळात क्रिकेट खेळले जेव्हा वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड क्रिकेटमध्ये सगळ्यात मजबूत होती.

टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड

सर गारफिल्ड सोबर्स यांनी वेस्ट इंडिजसाठी 93 टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या 160 इनिंगमध्ये त्यांनी 57.78 च्या सरासरीने 8,032 रन केले. टेस्ट क्रिकेटमध्ये सोबर्स यांच्या नावावर 26 शतकं, 30 अर्धशतकं, दोन द्विशतक आणि एका त्रिशतकाचा समावेश होता. 365 रन नाबाद हा सोबर्स यांचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वोत्तम स्कोअर होता. टेस्ट क्रिकेटमध्ये बराच काळ हा स्कोअर सर्वाधिक होता.

बॉलिंगमध्येही मॅच विनर

सोबर्स यांनी फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही तेवढंच योगदान दिलं. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 235 विकेट आहेत. सोबर्स यांची बॉलिंग सरासरी 34.04 आणि इकोनॉमी 2.33 होती. सोबर्स यांनी 6 वेळा इनिंगमध्ये 5 आणि 8 वेळा चार विकेट घेतल्या. 73 रनवर 6 विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. टीमच्या गरजेनुसार सोबर्स लेफ्ट आर्म फास्ट-मीडियम, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन किंवा लेफ्ट आर्म अनऑर्थोडॉक्स स्पिन (चायनामन) बॉलिंग करायचे. याच असाधारण प्रतिभेमुळे सोबर्स यांची गणना जगातल्या सर्वोत्तम ऑलराऊंडरमध्ये केली जायची.

वनडे करिअरही स्पेशल

सोबर्स यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त एक वनडे खेळली, यात त्यांनी एकही रन केली नाही पण एक विकेट मात्र घेतली. सर गारफिल्ड सोबर्स यांना क्रिकेटचा पहिला महान आणि आधुनिक ऑलराऊंडर मानलं जातं. बॅटिंगमधला क्लास, बॉलिंगमधली विविधता आणि चित्त्यासारखी चपळ फिल्डिंग यामुळे सोबर्स यांनी क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेलं. सोबर्स यांचा हा खेळ फक्त कॅरेबियनच नाही तर जगभरातल्या तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा देणारा ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *