Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं


Kiran Rao Supports Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचा आज उपोषणाचा (Hunger Strike) 20 वा दिवस. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या उपोषणामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या  (CJP)च्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण केलं आहे. दरम्यान, सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अनेक जण मैदानात उतरले आहेत. अनेकांनी सोनम वांगचुक यांचं समर्थन दर्शवलं.   अशातच आमिर खानची एक्स वाईफ आणि फिल्ममेकर किरण राव  हिनं देखील सोनम वांगचुक यांना सपोर्ट केला आहे.  

किरण रावचा सोनम वांगचुकला पाठिंबा (Kiran Rao Supports Sonam Wangchuk Shares post)

 आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी, किरण रावने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटचा डीपी बदलला आहे.  तिनं सोनम वांगचुक यांचा  फोटो तिच्या इन्स्टाग्राम डीपीवर ठेवला आहे. ‘मी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देते’ असं फोटोमध्ये दिसत आहे.  तिनं आपल्या पोस्टमध्येही सोनम वांगचुक यांचा फोटो शेअर केला आहे. तिनं सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ  एक पोस्ट लिहिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मी सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, कॉकरोच जनता पार्टी आणि देशातील सर्व नागरिक जे विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहे, त्यांच्या सपोर्टमध्ये मी उभी आहे’, असं किरण राव पोस्टमध्ये म्हणाली. 

‘न्याय मिळावा यासाठी उपोषण करणाऱ्या सोनमजी, नेहा, मनीष, अमीन आणि इतर सर्वांना माझा सलाम. न्याय मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केलं आहे.  देशातील प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे, याची आठवण करुन दिल्याबद्दल, आपला देश तुमचा आभारी आहे’, असंही किरणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.  ’19 दिवस उलटूनही या उपोषणावर काहीही बोलले जात नाहीये. ही खरंच एक दु:खद बाब आहे’.

‘सत्तेतील राजकारण्यांना ऐकू यावे, यासाठी लोकांनी अजून काय करायला हवे?.  मी सरकारला विनंती करते की,  त्यांनी आंदोलकांशी बोलावे.  विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात.  या अडथळ्यांना दूर करावे. हा आमचा हक्क आहे’, असंही किरण रावने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. सध्या किरण रावची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या पोस्टचं समर्थन दर्शवलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *