Sohail Khan Reveals He Was Abused: अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचा रिअॅलिटी शो ‘अलायंस’ (The Alliance) सध्या चर्चेत आहे. हा शो विशेषत: सोहेल खानमुळे (Salman Khan) चर्चेत आला होता. या शोमधील स्पर्धक (Sohail Khan) आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नुकतंच सोहेल खानची एक्स वाईफ सीमा सजदेहची एन्ट्री झाली. या शोमध्ये दोघांचीही केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अलिकडेच सोहेल खानने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत एक धक्कादायक खुलासा केला. ज्यामुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसला. सोहेलला लहानपणी लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता, असा खुलासा त्याने केला. त्याने ही गोष्ट आपल्या परिवारापासून लपवून ठेवली होती.
सोहेल खानने आपल्या लहानपणीबाबत धक्कादायक खुलासा केला (Sohail Khan reveals childhood Trauma)
सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानने आपल्या पर्सनल आयुष्याशी निगडीत एक धक्कादायक खुलासा केला. जे ऐकून अनेकांना जबरदस्त धक्का बसला. या शोमध्ये सोहेल म्हणाला, ‘मी रॅगिंगच्या विरोधात आहे. मी कायम माझ्या दोन्ही मुलांना सांगतो की, जर कुणी तुम्हाला त्रास देत असेल, तर न घाबरता मला येऊन सांगा. कारण माझ्यासोबत अशा प्रकारच्या भयंकर गोष्टी घडून गेल्या आहेत’, असं सोहेल म्हणाला.
आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत सोहेल म्हणाला, ‘मी खूप लहान होतो, जेव्हा माझ्यासोबत कुणीतरी लैंगिक अत्याचार केला होता. मी बरेच वर्ष याबाबत कुणालाही सांगितलं नव्हतं. पण जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी माझ्या वडिलांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी विचारलं की, इतकी वर्ष झाली, ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली होती? तेव्हा मी, मला या गोष्टीची लाज वाटत होती, असं सांगितलं’, असं सोहेल खान म्हणाला.
आपल्यासोबत झालेल्या छळानंतर, सोहेल खान आपल्या मुलांना कायम, काहीही चुकीचं घडल्यास त्याबद्दल सांगा, गप्प बसू नका, असा सल्ला दिला. ही गोष्ट झाल्यानंतर त्यानं मुलांच्या नावाचाही किस्सा सांगितला. सोहेल नेहमी आपल्या मुलाचे नाव ‘राम’ ठेवू इच्छित होता. पण डिलिव्हरीनंतर जेव्हा मुलगा झाला, तेव्हा सीमाने ‘निर्वाण’ हे नाव सुचवले. तेव्हा सोहेलने देखील या नावाला सहमती दर्शवली, अशी माहिती त्याने रिअॅलिटी शोमध्ये दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘डॅडी’ अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला…