पक्ष सोडली तरी मैत्री कायम, धाराशिवमध्ये काय घडतंय? ओमराजेंच्या बॅनर्सची चर्चा, कैलास पाटलांच्या मनात काय? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Dharashiv Politics: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या टोकाचे राजकीय वैर आहे. धाराशिव जिल्ह्यात मात्र हे वैर आहे का मित्रत्व? हेच कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे.

ओमराजे निंबाळकर-कैलास पाटील
ओमराजे निंबाळकर-कैलास पाटील

धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने धाराशिवची राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून गेली आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कैलास पाटील हे देखील जातील, अशी शक्यता होती. मात्र कैलास पाटील यांनी निष्ठेला महत्त्व देत असल्याचे सांगत ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. राजकीय वाट वेगळी झालेली असली तरी त्यांच्या मित्रत्वाच्या नात्यात कोणतीही अडचण आलेली दिसत नाही.

धाराशिवमध्ये ‘ओके पॅटर्न’ची सर्वाधिक चर्चा होत आहे. त्याचे कारण ठरले आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचा एकत्रित फोटो असलेले वाढदिवसाचे बॅनर!.

पक्ष बदलूनही मित्र प्रेम कमी होईना, कार्यकर्ते संभ्रमात

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या बॅनरवर ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे फोटो एकत्रितपणे झळकले असून ‘धाराशिव जिल्ह्यात ओके पॅटर्न’ असा मजकूर बॅनरवर लिहिला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या टोकाचे राजकीय वैर आहे. धाराशिव जिल्ह्यात मात्र हे वैर आहे का मित्रत्व हेच कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे.

राजकीय साथ सोडलेली असली तरी दोन्ही नेत्यांमध्ये अजूनही मित्रत्वाचे संबंध

राजकीय साथ सोडलेली असली तरी दोन्ही नेत्यांनी त्यांच्यातले मित्रत्व जपून ठेवले आहे. दोन्ही नेत्यांचे एकत्रित फोटो पाहून कार्यकर्ते देखील बुचकुळ्यात पडले आहेत. कोणता झेंडा हाती धरायचा? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

ठाकरेंवर टीका करणार नाही, कामातून उत्तर देईल

उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असली तरी त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही. मतदारसंघातील नाराज लोकांना माझ्या कामातून उत्तर देईल, अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मांडली.

दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती, त्यांनी चुकीची भूमिका घेतली, असे कैलास पाटील म्हणाले होते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

पक्ष सोडली तरी मैत्री कायम, धाराशिवमध्ये काय घडतंय? ओमराजेंच्या बॅनर्सची चर्चा, कैलास पाटलांच्या मनात काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *