Akola Crime News: अकोला-बडनेरा रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात बांगड्या भरत तरुणीने चांगलाच धडा शिकवला. तसेच इतकंच नव्हे तर ओठांवर लिपस्टिक आणि लाली देखील लावली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आतापर्यंत महिलांची छेड काढणाऱ्यांना चोप देताना तुम्ही पाहिलं असेल. पण एका एक्सप्रेस रेल्वेत छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीने गांधीगिरी पद्धतीने धडा शिकवलाय. ‘अकोला-बडनेरा’ प्रवासादरम्यान रेल्वेत छेड काढणाऱ्या रोमियोच्या हातात तरुणीने आपल्याच हातातील बांगड्या भरल्या. इतकंच नव्हे तर तरुणाच्या ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत धडा शिकवलाय. शेगाववरून बडनेराकडे येणाऱ्या ‘भुसावळ-वर्धा’ ट्रेनमध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला चक्क तरुणीने आणि प्रवाशांनी मिळून चांगलाच गांधीगिरी स्टाईलने धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? (Akola Railway Crime News)
‘भुसावळ-वर्धा एक्सप्रेस’ रेल्वेत प्रवास करत असताना एका तरुणाने तरुणीशी अश्लील वर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने न घाबरता त्याला जागेवरच गाठले आणि सर्वांसमोर चांगलेच झापलंये. तरुणीचा आक्रमक पवित्रा पाहून डब्यातील इतर प्रवासीही तिच्या मदतीला धावून आले. हातात भरल्या बांगड्या आणि त्याच्या लिपस्टिक आणि लाली लावत फासण्यात आलंये. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: