Paresh Rawal On Akshay Kumar And ‘OMG 2’: ‘अक्षय कुमारमुळे ‘OMG2′ सिनेमा नाकारला…’; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले…


Paresh Rawal On Akshay Kumar And ‘OMG 2’: बॉलिवूडचे (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) सध्या चर्चेत आहेत, ते त्यांनी केलेल्या काही खळबळजनक खुलाशांमुळे. अभिनेते परेश रावल (Actor Paresh Rawal) यांनी दावा केलाय की, ‘OMG 2’ ची स्क्रिप्ट मुळात त्यांनी दिग्दर्शक अमित राय यांच्या सहकार्यानं लिहिलेली. पण, तरीसुद्धा या स्क्रिप्टचं किंवा संकल्पनेचं श्रेय त्यांना अजिबातच देण्यात आलेलं नाही. अक्षय कुमार या प्रोजेक्टमध्ये सामील झाल्यानंतर स्क्रिप्टमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि त्यामुळेच त्यांनी या सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी नमूद केलंय.

विक्की लालवानीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परेश रावल यांनी स्पष्ट केलं की, त्यांची मूळ स्क्रिप्ट ही पिता-पुत्र यांच्यातील संबंधांवर आधारित एक ‘फॅमिली ड्रामा’  होती. ज्यामध्ये लैंगिक शिक्षण, सार्वजनिक मानहानी आणि न्यायासाठी पालकांचा लढा यांसारख्या विषयांचा समावेश होता. या कथेत देव किंवा कोणत्याही दैवी पात्राचा समावेश नव्हता आणि ती कधीही OMG चा थेट ‘सीक्वल’ म्हणून लिहिली गेली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.

साधं क्रेडिटसुद्धा दिलं गेलं नाही : परेश रावल (Paresh Rawal On Akshay Kumar)

परेश रावल यांनी सांगितलं की, सर्वात निराशाजनक बाब म्हणजे, सिनेमाच्या मूळ कल्पनेसाठी त्यांना अजिबातच कोणतंही क्रेडिट देण्यात आलं नाही. ते म्हणाले की, “सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे, मला त्या कथेचं किंवा संकल्पनेचं श्रेयही दिलं गेलेलं नाही. माझा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही…”

अभिनेत्यानं असाही दावा केलाय की, सिनेसृष्टीतील अनेक लोकांना या कथेच्या मूळ स्त्रोतांबद्दल माहिती होती. परेश रावल पुढे बोलताना म्हणाले की, “अमित, अक्षय कुमार (Akshay Kumar), अश्विन, अजय देवगण (Ajay Devgn), करण जोहर (Karan Johar) आणि सलमान खान (Salman Khan) या सर्वांना माहीत होतं की, ती माझी कल्पना आणि माझी स्क्रिप्ट होती. कदाचित अजय आणि सलमान यांनी विषयामुळे हा प्रकल्प नाकारला असावा, त्यांना तो विषय वादग्रस्त वाटला असावा. मी त्यांना ती संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला…”

परेश रावल यांनी सांगितलं की, त्यांनी दिग्दर्शक अमित राय यांच्याशी संपर्क साधलेला, ज्यांच्या ‘रोड टू संगम’ (Road to Sangam) सिनेमाचं ते खूप कौतुक करत असत, आणि त्यांना आपली प्राथमिक कल्पना सांगितली होती. त्यांनी स्पष्ट केलं की, ही कथा एका शाळकरी मुलाभोवती फिरते. त्या मुलाची एक प्रायवेट कृती रेकॉर्ड होऊन व्हायरल होते, ज्यामुळे त्याला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, त्याचे वडील त्याचा बचाव करण्याचा आणि मुलावर लादल्या गेलेल्या या अपमानाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात.

पुढे बोलताना परेश रावल यांनी सांगितलं की, अक्षयनं नंतर या सिनेमात काम करण्याची विनंती केली होती, पण त्यांनी अक्षयची ती ऑफर नाकारली, कारण सिनेमाची कथा त्यानं विकसित करण्यात मदत केलेल्या कथेसारखी नव्हतीच.

… म्हणून अक्षय कुमारची ऑफर नाकारली (Paresh Rawal On ‘OMG 2’)

परेश रावल म्हणाले की, “मी अक्षयशी बोललो. त्यानं मला हा चित्रपट करण्यास सांगितलं. मी त्याला म्हणालो, “नाही. हा तो सिनेमा नाही, ज्याची मी कल्पना केली होती. या कथेत ईश्वराची काहीच भूमिका नाही…” त्यानं माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मी सुरुवातीपासूनच या पटकथेच्या प्रक्रियेत सहभागी होतो. ती कथा नेमकी कशी असायला हवी होती, हे मला पक्कं ठाऊक होतं. म्हणूनच मी यातून माघार घेतली…” अखेर, वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली, तर अक्षय ‘शिवाचा दूत’ म्हणून पडद्यावर दिसला.

दरम्यान, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाला, लैंगिक शिक्षण आणि धार्मिक विषय यांच्या मिश्रणामुळे CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कडून कठोर छाननीला सामोरं जावं लागलं. अक्षयच्या पात्राचं चित्रण भगवान शिव यांच्याऐवजी एका दैवी दूताच्या रूपात करणं यांसारखे अनेक बदल केल्यानंतर, अखेरीस या सिनेमाला ‘A’ प्रमाणपत्र देऊन मंजुरी देण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: ‘एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध…’; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं ‘बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *