Mumbai Accident News : मुंबईत भीषण अपघाताची घटना घडली आहे. मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर 6 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात ही घटना घडली आहे. 5 कार आणि 1 बस एकमेकांवर आदळल्या आहेत. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी
मुंबईच्या मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 6 वाहने ऐकमेकांवर आदळली आहेत. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अपघातानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या कारचा मध्य प्रदेशमध्ये अपघात
नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या चारचाकी गाडीचा मध्य प्रदेशात काल रात्री भीषण अपघात झाला आहे. शुभम मोटघरे आपल्या सहकाऱ्यांसोबत मध्य प्रदेशातून परत येत असताना हरदा रोड वरील जंगलात कार समोर अचानक एक नीलगाय आली. समोर नीलगाय आल्याने ड्रायव्हरचे कार वरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात मोटघरे थोडक्यात बचावले, सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही.शुभम मोटघरे हे प्रभाग 26 चे नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक आहेत.
समृद्धी महामार्गावर कार-पिकअपची जोरदार धडक; कार चालकाचा मृत्यू
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?