Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: ‘सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण…’; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट


Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: सध्या मनोरंजन विश्वात (Entertainment World) घटस्फोट (Divorce) घेण्याचा धक्कादायक ट्रेंड सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, एकापठोपाठ एक अनेक सेलिब्रिटी जोडपी एकमेकांपासून विभक्त होत आहेत. अनेक जोडप्यांनी आपण आपसी सहमतीनं घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलंय. अशातच आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचा समावेश झाला आहे. मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) टॉप सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेल्या जोडप्यानं विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि ऊर्मिला कानेटकर (Urmilla Kanetkar) यांनी आपल्या सुखी संसाराचा ‘दी एन्ड’ करत, घटस्फोट घेतला आहे. 

आदिनाथ  कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर (Adinath Kothare Urmilla Kanetkar Getting Divorce) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलंय. आदिनाथ कोठारे म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंचा लेक. म्हणजेच, उर्मिला कानेटकर कोठारेंची सुनबाई. आदिनाथ आणि उर्मिलाला एक मुलगी आहे. 

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

आदिनाथ आणि उर्मिला यांची सोशल मिडिया पोस्ट

“आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो,

खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत.

आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.

गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यौंनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.

म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.”

आदिनाथ आणि ऊर्मिला

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगलेल्या. पण, त्यावर दोघांकडूनही कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. आज अखेर दोघांनी आपसी सहमतीनं घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलंय. दोघांनीही पती-पत्नी म्हणून वेगळं होत असल्याचं जाहीर केलंय. पण, मुलगी जिजासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, असंही दोघांनी नमूद केलंय. 

मैत्री, प्रेम अन् लग्न…. अखेर 15 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोड

दोघांमध्ये घट्ट मैत्री होती, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये उर्मिला हिनं आदिनाथसोबत आपली लग्नगाठ बांधली आणि मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कुटुंबापैकी एक असणाऱ्या कोठारे कुटुंबाची सून झाली. त्यानंतर 2017 मध्ये उर्मिला हिनं गोंडस मुलीला जन्म दिला. उर्मिला आणि आदिनाथ यांच्या मुलीचं नाव जिजा आहे. 

मुलीच्या जन्मानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना, उर्मिला आणि आदिनाथ यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला. अखेर आज दोघांनी पोस्ट करुन वेगळं झाल्याचं जाहीर केलंय. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *