Isha Keskar on Exit Serials: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी ‘ मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय होती. टीआरपीवरही टॉपला असलेल्या या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ईशा केसकरने मालिका सोडली आणि अवघ्या महिन्याभरात वाहिनीलाच ही मालिकाच गुंडाळावी लागली.यापूर्वीही तिने अशाच एका मालिकेतून मधूनच निरोप घेतला होता.मालिका सोडण्याच्या निर्णयांमुळे अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री ईशा केसकरने मालिका सोडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मालिकाविश्वात काम आणि अचानक एक्झिट घेण्यामागची कारणही तिने सांगितली आहेत.
मालिका सोडण्याविषयी काय म्हणाली ईशा केसकर?
मालिका सोडण्याविषयी ईशा म्हणाली ‘ कधीतरी शारीरिक स्वास्थ्य या गोष्टीला आपण गृहीत नाही धरू शकत सतत. जरी मी तरुण असले, खाण्यापिण्याकडे माझं लक्ष असलं, झोपे कडे मी प्रायोरिटीने बघत असले तरीसुद्धा रोज 16 तास किंवा 14 तास शूट करणे आणि त्याहीपेक्षा जास्त तिथलं वातावरण पण मॅटर करतं, असं मला वाटतं. थोडसं मला खूप वाटायला लागलं होतं अलीकडे की, मी यासाठी बनले नाहीये. मला अनेक मोठ्या कलाकारांनी सांगितलं होतं की, मालिकाविश्व खूप छान चकचकीत वेलकमिंग आणि पैसे देणारं असलं तरी, आपल्याकडून काहीतरी घेतं सुद्धा.भूमिका करत असताना तसा काही अनुभव नाही आला. वाईट काही नाही झालं. पण मला असं झालं की, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवायचा आहे. माझ्या तब्येतीसाठी द्यायचा होता. पण मालिकाही मला तेवढीच महत्त्वाची होती. चॅनल – प्रोडक्शन -मी एक कलाकार म्हणून आम्ही असे एका प्रॉब्लेममध्ये आलो की जिथे त्यांना काही मध्य काढता येत नव्हता.आणि मीही काही मदत करू शकत नव्हते. पण मला असं वाटत होतं की काहीतरी मध्ये निघेल.पण दुर्दैवाने तसं नाही घडलं.
ती म्हणाली ‘शेवटी मला प्रेक्षकांना एकच गोष्ट सांगायची की जेवढे काही काम मी करू शकले ते मी मनापासून केलं. ते माझ्याकडून जेवढे 100 -200% देता येतील तेवढे मी दिले.मी त्यातून आनंदही घेतला.आणि त्याबद्दल मला जे प्रेम मिळालं त्यासाठी मी कायम ऋणी आहे. माझा कायम असा प्रयत्न असतो की माझी कुठलीही भूमिका आधीच्या भूमिकेसारखी नसावी.या सगळ्यामुळे मी एक्झॉस्ट झाले.ते प्रेशर मला जरा जास्त वाटलं.कदाचित म्हणूनच मी लीडमध्ये मालिका करायला नको असं मला बऱ्याच जणांनी कमेंट केली.पण मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न केला. ‘ असं ईशा केसकरने सांगितलं.
“मालिका सोडताना पुढचा विचार करण्याचा वेळच मला माझ्या शरीराने दिला नाही.आपल्याला हात पाय दुखत असतील मानेखाली काही होत असेल तर टीव्ही कलाकाराला काही फरक पडत नाही.पण माझ्या डोळ्यावर एक फोड आला होता, जो बरा व्हायला वेळ घेणार होता. त्यासाठी मला दहा तास झोपणं गरजेचं होतं. माझ्या पाण्याचा इंटेक पूर्ण होणं अपेक्षित होतं. यापूर्वी जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी समांतर रेषेत दुसरी लीड अभिनेत्री होती.त्यामुळे त्या मालिकेत माझ्यावर प्रेशर नव्हतं.पण इथे ते माझ्यावर आलं. एक वर्ष मी ते काम खूप आनंदाने केलं.पण सहकलाकार असल्याने दुसऱ्या वर्षी फारच धावपळ झाली.अशा वेळेस आपण जरा विचार केला पाहिजे.त्यांचं नुकसान होण्यापेक्षा आणि माझेही मोठे नुकसान होण्यापेक्षा मी आत्ताच त्यातून वेगळं होणं मला जास्त योग्य वाटत होतं.म्हणून मी मालिका सोडली. पण आता असं चित्र झालं की ‘ईशा मालिका सोडते ‘ इतर कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा आता टोमणे मारतात.” ईशा केसकर म्हणाली.