Russia Oil : युक्रेनने दिलं मोठं सरप्राइज, रशियावर आली भारताकडे तेल मागण्याची वेळ पण आपण सांगितलं की.. – Marathi News | Russia seeks petrol from india after ukraine strikes refinery energy crisis


जगात सध्या दोन युद्ध सुरु आहेत. त्यामुळे जागतिक तेल बाजारपेठेत सध्या बरेच चढ-उतार पहायला मिळतायत. अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटलं आहे. त्याचवेळी मागच्या चार वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धांमध्ये तेल रिफायनरीजना टार्गेट केलं जात आहे. त्याचा थेट परिणाम तेल उत्पादनावर आणि रिफायनिंग म्हणजे प्रोसेस करण्यावर होत आहे. आता भारत हा काही तेल निर्यातदार देश नाही. जगातील एक मोठा तेल आयात करणारा देश आहे. पण आता जागतिक ऊर्जा बाजारपेठेत एक हैराण करणारं, ऐतिहासिक वळण आलं आहे. रशिया हा जगातील एक मोठा तेल आणि गॅस उत्पादक देश आहे. पण रशियाने इंधन संकटाचा सामना करताना भारतीय रिफायनरीजकडे अतिरिक्त पेट्रोल पुरवठ्यासाठी संपर्क केला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार यूक्रेनच्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यात रशियाच्या रिफायनिंग नेटवर्कचं मोठं नुकसान झालं आहे. रशियात अलीकडच्या वर्षातील भीषण पेट्रोल संकट निर्माण झालं आहे. या संकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी रशियाच्या दिग्ग्ज तेल कंपन्यांनी भारताच्या सरकारी आणि खासगी रिफायनरीजशी संपर्क साधला आहे. रिपोर्टनुसार रशियाच्या प्रमुख ऊर्जा कंपन्या रोसनेफ्ट, गजप्रोम नेफ् आणि लुकोइल यांची भारतीय रिफायनरीसोबत अतिरिक्त पेट्रोल पुरवठ्यासाठी चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार करार झाला तर इंधन पुरवठा थेट नाही, तर आंतराराष्ट्रीय ट्रेडिंग कंपन्यांमार्फत होईल.

स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किती वेळ लागेल?

सरकारी क्षेत्रातील तीन भारतीय रिफायनरीजशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, त्यांना रशियन कंपन्यांनी विनंती केली आहे. पण त्यांच्याकडे निर्यातीसाठी अतिरिक्त पेट्रोल उपलब्ध नाहीय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियन ऊर्जा मंत्रालय आणि रशियन तेल कंपन्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. रशिया भारताकडे तेल मागतोय यावरुन युक्रेनने रशियाच्या तेलाच्या पायाभूत रचनेला किती धक्का पोहोचवलाय ते दिसून येतं. रिपोर्टनुसार सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाची जवळपास 40 टक्के रिफायनिंग क्षमता ठप्प झाली आहे. स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कमीत कमी दोन महिने लागतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *