Argentina vs England FIFA World Cup Semi Final: गतविजेत्या अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लिओनेल मेस्सीच्या संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला 2-1 ने पराभूत केले. 85 मिनिटांपर्यंत 0-0 ने पिछाडीवर असताना, त्यांनी शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल करून विजय निश्चित केला. 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना स्पेनशी होईल.
एकूण चौथे विजेतेपद जिंकण्याची संधी
अटलांटा येथे अँथनी गॉर्डनने 55व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे इंग्लंड अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करत होता. पण लिओनेल मेस्सीच्या संघाने शेवटच्या क्षणी सामन्याचे चित्र पालटले. मेस्सीच्या पासवर एन्झो फर्नांडिसने 25 यार्डांवरून एक शानदार गोल करून स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर, अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या मिनिटात, बदली खेळाडू लॉटारो मार्टिनेझने मेस्सीच्या क्रॉसवर अचूक हेडर मारून विजय निश्चित केला. ही अर्जेंटिनाची सातवी विश्वचषक अंतिम फेरी असेल. या संघाने यापूर्वी 1930, 1978, 1986, 1990, 2014 आणि 2022 मध्ये अंतिम सामना खेळला आहे. अर्जेंटिनाने 1978,1986 आणि 2022 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. आता, त्यांच्याकडे सलग दुसरे आणि एकूण चौथे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.
A moment I’ll never. Ever. Forget. The cross by Messi for the go ahead. Sensational. #WorldCup2026 #LionelMessi pic.twitter.com/RzcWAGXqtx
— Maria Martin (@Ria_Martin) July 15, 2026
पहिला हाफ वादांनीच भरला
सामन्याच्या सुरुवातीपासूनच हे स्पष्ट होते की हा सामना केवळ फुटबॉलपुरता मर्यादित नव्हता. तिसऱ्या मिनिटाला, इंग्लंडच्या इलियट अँडरसनवर झालेल्या टॅकलमुळे दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसमोर आले. रेफरी इस्माईल एल्फाथ यांना हस्तक्षेप करावा लागला. संपूर्ण पहिल्या हाफमध्ये खेळाडूंमध्ये वारंवार चकमकी झाल्या आणि फाऊल्सही भरपूर झाले. इंग्लंडला 33व्या मिनिटाला पहिली संधी मिळाली. डेक्लन राईसच्या फ्री-किकवर जॉन स्टोन्सने हेडर मारला, पण चेंडू नेटच्या बाहेर गेला. अर्जेंटिनाकडून, 38व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसने बॉक्सच्या बाहेरून शॉट मारला, जो क्रॉसबारच्या वरून गेला. 37 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सी पुढे सरसावला, पण इलियट अँडरसनने त्याच्यावर फाऊल केला. यासाठी अँडरसनला पिवळे कार्ड मिळाले. 42व्या मिनिटाला, अर्जेंटिनाच्या लिसांद्रो मार्टिनेझला ज्युड बेलिंगहॅमची जर्सी ओढल्याबद्दल कार्ड दाखवण्यात आले. मध्यंतराची शिट्टी वाजल्यानंतरही दोन्ही संघांचे खेळाडू पंचांशी वाद घालत राहिले आणि मेस्सी सर्वात शेवटी मैदानाबाहेर गेला.
La hinchada argentina cantaba “MESSI, MESSI” y el propio Lionel LE PIDE A LA GENTE QUE CANTE POR TODO EL EQUIPO.
Esto es ser un líder. 🧠🇦🇷 pic.twitter.com/DBmRepIQXa
— Sudanalytics (@sudanalytics_) July 16, 2026
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला इंग्लंडचा गोल
मध्यंतरानंतर अर्जेंटिनाने जोरदार सुरुवात केली. 48व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने लक्ष्यावर पहिला शॉट मारला, जो जॉर्डन पिकफोर्डने उत्कृष्टरित्या वाचवला. 55व्या मिनिटाला इंग्लंडने सामन्यातील पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या बचावाला हॅरी केनचा लांब पास पूर्णपणे क्लिअर करता आला नाही. डेक्लन राइसने चेंडू मॉर्गन रॉजर्सकडे पास केला. रॉजर्सने उजवीकडून अचूक क्रॉस दिला, जो अँथनी गॉर्डनने बॉक्समधून सहजपणे गोलमध्ये रूपांतरित केला. हा गॉर्डनचा स्पर्धेतील पहिला गोल होता आणि इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली.
मेस्सीच्या पासने सामन्याचे चित्र पालटले
एक गोल स्वीकारल्यानंतर, अर्जेंटिनाने आक्रमक खेळ खेळायला सुरुवात केली. 86व्या मिनिटाला संघाला कॉर्नर मिळाला. लिओनेल मेस्सीने शॉर्ट कॉर्नर खेळून चेंडू एन्झो फर्नांडिसकडे पास केला. फर्नांडिसने सुमारे 25 यार्डांवरून शॉट मारला. चेंडू खेळाडूंच्या मधून जात थेट जाळ्यात गेला. या गोलमुळे स्कोअर 1-1असा बरोबर झाला. इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटात, मेस्सीने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. त्याने उजव्या बाजूने चेंडू बॉक्समध्ये पाठवला. बदली स्ट्रायकर लॉटारो मार्टिनेझने बचावपटूंना मागे टाकत एका अप्रतिम हेडरने चेंडू गोलमध्ये टाकला. अर्जेंटिनाने सात मिनिटांतच सामन्याचे चित्र पालटले आणि 2-1 अशी निर्णायक आघाडी घेतली आणि इंग्लंडच्या स्वप्नाच्या चक्काचूर केला.
इतर महत्वाच्या बातम्या