बीड : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून बीड (Beed) जिल्हा केंद्रस्थानी असून येथील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. बीड शहर असेल किंवा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी ऊसतोड कामगाराला मारहाण, कधी हॉटेल व्यवसायिकावर जीवघेणार हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता, मुलीला का मारले विचारणा केल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली असून उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, आरोपींच्या अटकेसाठी (Crime news) नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या केला आहे.
बीडच्या अंबाजोगाई येथील चनई वडार वस्ती परिसरात माझ्या मुलीला का मारले? असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका पन्नास वर्षीय महिलेच्या डोक्यात वीटेने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली, त्यानंतर आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यशोदा बालाजी राठोड असे मृत महिलेचे नाव असून या महिलेच्या मुलीला आरोपीने मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेली असता सुभाष लष्करे याने शिवीगाळ करत वीट फेकून मारली. त्यात महिला गंभीर जखमी झाली.
दरम्यान, हे भांडण सोडवायला गेलेल्या राणी राठोड यांनाही आरोपीच्या मुलांनी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी राणी बालाजी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि इंद्र सुभाष लष्करे या चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणातील एक आरोपी अटक असून उर्वरित तीन आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात काही वेळ ठिय्या दिला.
जमीन मोजणीवरुन वाद, पोलिांकडून मारहाण
पालघर जिल्ह्याच्या डहाणूमधील वरोती येथे खासगी जमीन मोजणी दरम्यान पोलिसांकडून आदिवासींना मारहाण करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू असताना हरकत घेणाऱ्या आदिवासींना मारहाण करण्यात आली असून मुख्य रस्त्यावर पडेपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजेच महिलांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. आमची जमीन पोलीस बंदोबस्तात मोजत असल्याचा आदिवासींचा आरोप आहे.
हेही वाचा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?