राज्यातील महायुती सरकारची बहुचर्चित, महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ कामच चर्चेत राहिली आहे. ही योजना राज्यात गेमचेंजिंग ठरेली. आता या योजनेबाबात राष्ट्रवादी शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी एक मोठी अपडेट देत सरकारकडे मागणी केली आहे. त्या काय म्हणाल्या जाणून घ्या…
लाडकी बहिण योजनेबाबत काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी नुकताच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत त्यांनी लाडकी बहिण योजनेवर वक्तव्य करत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. ‘लाडकी बहीण योजनेची चौकशी झाली पाहिजे. वेळ पडली तर एसआयटी बसवा. पण एक निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. बहीण भावाच्या नात्यापेक्षा कोणतंच नातं पवित्र नसतं. रामाला फसवलं. त्यांचं नाव या लोकांनी खराब केलं. आता बहिणीच्या नात्यात हे सर्व दिसतंय. बहीण आणि प्रभू श्रीराम या दोन्ही गोष्टी आस्थेच्या आहेत. त्यामुळे अंतकरणातून आम्हाला दु:ख होत आहे’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून धक्कादायक बाब समोर आली. ई-केवायसी आणि पडताळणीनंतर तब्बल ९२ लाखांहून अधिक महिला लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला आहे. या निर्णयामुळे मोठा राजकीय वादळ उठले असून, विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘आमचं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही’
सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, आमचं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही. आम्ही राजकारणात येतो तेव्हा आमची भावना ही चांगली पॉलिसी मेकिंगची आहे. म्हणून दिल्लीत जातो. खासदार का झाले, विधेयकावर काम करावं. पॉलिसी मेकिंगचं काम करावं. ते सोडून सर्व चर्चा होते. आम्हाला आधी काँग्रेसमध्ये मर्ज केलं, नंतर बीजेपीत मर्ज केलं, नंतर सेनेत मर्ज केलं. आता मनसेतच राहिलं. आमच्या पक्षाकडून कोणतं स्टेटमेंट आलं? आमच्या पक्षाचा आम्ही सोडून सर्वच विचार करत आहे. आमचा नेता पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट मी पाहिलं नाही. तुमचे सूत्र तुम्हाला सांगतात. आमच्याकडे ईडी आणि सीबीआय नाही, त्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी केली जात आहे. पक्षाचं खच्चीकरण अशी बदनामी करून केलं जात आहे.
पुढे त्या म्हणाल्या, आम्हाला ज्या रस्त्याने जायचं नाही त्याची चर्चा कशाला करू? आम्ही इंडिया आघाडीत काम करतोय. आम्हाला ना काँग्रेसने प्रस्ताव दिला ना आम्ही काँग्रेसला दिला. ना भाजपने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही त्यांना दिला. ना आम्हाला एनडीएने प्रस्ताव दिला नाही आम्ही त्यांना दिला नाही.