Aamir Khan Gauri Spratt Wedding: ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर…’


Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलिवूडचा (Bollywood News) ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ (Mr. Perfectionist) म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Actor Aamir Khan) सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे (Aamir Khan Third Wedding) भलताच चर्चेत आहे. साठी ओलांडलेल्या आमिर खाननं (Aamir Khan) नुकतंच तिसरं लग्न केलंय. त्यानं त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्यासोबत आपल्या आयुष्याची तिसरी लग्नगाठ बांधली. यापूर्वी आमिर खाननं दोन लग्न केलेली आणि त्याचे दोन्ही संसार मोडलेत. त्याला आधीच्या लग्नांपासून तीन मुलं आहेत. सध्या आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरुन राजकीय मंडळींकडून लव्ह जिहादचे आरोप केले जात आहे. मंत्री नितेश राणेंनी तर आमिर खानला लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसिडर असं म्हटलं आहे. तसेच, बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनांनी त्याच्यावर ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) आरोप केला आहे. इतकंच काय तर, आमिर खानविरोधात फतवादेखील जारी करण्यात आला आहे. अशातच, तिसऱ्या लग्नावरुन मोठा गदारोळ होताच, आता आमिर खाननं त्याच्यावर आणि गौरीवर होणाऱ्या सततच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. 

लव्ह जिहादच्या आरोपांवर आमिर खानचं सडेतोड प्रत्युत्तर (Aamir Khan On Love Jihad Allegation)

आपल्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगला उत्तर देताना आमिर खाननं ‘डेक्कन क्रॉनिकल’शी बोलताना आपलं मत मांडलंय. तसेच, टीकेची झोड उठवणाऱ्यांना त्यानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. आमिर खान म्हणाला की, त्याचं कुटुंब अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक विचारांचं आहे. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न हिंदू पुरुषांशी झाली आहेत आणि त्याच्या मुलीनंही एका हिंदू व्यक्तीशीच लग्न केलंय. त्याचा चुलतभाऊ मन्सूर यानं एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केलंय. गौरी, रीना आणि किरण यांनी त्याच्याशी लग्न करताना आपला धर्म बदलला नाही, कारण हे विवाह कायदेशीर नोंदणी पद्धतीनं (सिव्हिल सेरेमनी) पार पडलेले. मुळात गौरी हिंदू नाहीच, ती ख्रिश्चन आहे. आमिर खाननं पुढे सांगितलं की, गौरी ख्रिश्चन असली तरी ती धार्मिक विधींचं काटेकोरपणे पालन करत नाही. 

आमिर खाननं यावेळी बोलताना मुंबईतील वांद्रे इथल्या पाली हिलमध्ये 100 कोटी रुपयांच्या ‘मल्टी-जेनरेशनल स्कायविला’च्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिलंय. त्यानं सांगितलं की, मुंबईतील इतर अनेक इमारतींप्रमाणेच त्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचाही पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) केला जातोय. हा निर्णय त्यांच्या हाऊसिंग सोसायटीनं घेतला आहे, ज्यामध्ये स्वतः आमिर खानसह एकूण 24 सदस्यांचा समावेश आहे. या गटात एका बिल्डरचाही समावेश आहे. मोठ्या संख्येनं फ्लॅट्स खरेदी केल्यामुळे इमारतीचा बराचसा भाग त्या बिल्डरच्या मालकीचा आहे.

दरम्यान, आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्याशी झालं होतं. त्यांना जुनैद (मुलगा) आणि इरा खान (मुलगी) ही दोन मुलं आहेत. त्याचं दुसरं लग्न किरण राव यांच्याशी झालं होतं आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. 5 जुलै रोजी आमिर खाननं कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिसरं लग्न केलंय. आमिरची तिसरी बायको गौरी स्प्रॅट ही एक व्यावसायिक आहे. गौरीचंही हे दुसरं लग्न आहे. तिला तिच्या आधीच्या लग्नापासून सात वर्षांचा मुलगा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: अनिल कपूर यांच्या फिल्मची स्क्रिप्ट चोरुन बनवलाय हॉलिवूडचा ‘हा’ ऑस्कर विनिंग सिनेमा; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *