Alpha Box Office Collection: सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी ‘अल्फा’नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?


Alpha Box Office Collection: निर्माता आदित्य चोप्रा यांचा बहुचर्चित चित्रपट ‘अल्फा’ (Alpha) सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित आहे. दिग्दर्शक शिव रवैल यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या स्पाय-थ्रिलरला बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता. भारतीय बॉक्स ऑफिसप्रमाणेच परदेशातही या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर ‘अल्फा’च्या कमाईने अचानक मुसंडी मारलीय.दुसऱ्या मंगळवारी झालेल्या जागतिक कमाईमुळे हा चित्रपट पुन्हा जोर पकडत असल्याचे चित्र आहे.आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात किती कमाई केली,ते जाणून घेऊया.

‘अल्फा’ची जगभरातील कमाई

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असल्यामुळे ‘अल्फा’बाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. या चित्रपटात आलिया भट्ट, शर्वरी  वाघ, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मोठी स्टारकास्ट असूनही कमाईच्या बाबतीत ‘अल्फा’ला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी चित्रपटाने पुनरागमनाची चिन्हे दाखवली आहेत.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी ‘अल्फा’ने जगभरात अंदाजे 1.50  कोटी रुपयांची कमाई केली होती. तर 12 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी या कमाईत लक्षणीय वाढ झाली असून चित्रपटाने सुमारे 2 कोटी रुपयांचा वर्ल्डवाईड कलेक्शन केलं आहे. त्यामुळे ‘अल्फा’ची एकूण जागतिक कमाई आता जवळपास 95 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.अशीच कमाई कायम राहिली तर तिसऱ्या आठवडा संपण्यापूर्वीच ‘अल्फा’ 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या नव्या चित्रपटांमुळे ‘अल्फा’समोर आव्हान वाढण्याची शक्यता आहे.

‘पठाण’ ,’टायगर’सारखी जादू दाखवण्यात अपयशी

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील ‘टायगर’, ‘वॉर’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. मात्र, ‘अल्फा’ला तशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या व्यावसायिक कामगिरीवरून पाहता, ‘अल्फा’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *