Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी…


Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या FDA च्या धडक कारवायांमुळे हॉटेल्सधारक, खाद्यपदार्थांनी दुकानं, दूध डेअरी संचालकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. भेसळयुक्ती अन्नपदार्थांविरोधात FDA नं मोहीम हाती घेतली असून कित्येक हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकानं सील करण्यात आली आहेत. मे 2026 मध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यापासून, मुंढे त्यांच्या कठोर निर्णयांसाठी चर्चेत आहेत. सर्वसामान्यांमध्ये तर ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ची जोरदार चर्चा रंगली आहे.  

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी भेसळयुक्त दूध, चीज, गुटखा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. FDA कडून गेल्या काही दिवसांत भेसळयुक्त अन्नपदार्थांचे अनेक रॅकेट्स उध्वस्त करण्यात आलेत.  अशातच अनेक सेलिब्रिटींनीही तुकाराम मुंढेच्या या धडक कारवायांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी अभिनेता अभिजीत केळकर (Marathi Actor Abhijeet Kelkar) यानं FDA ची कारवाई आणि तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

अभिजीत केळकर फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला? (Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe)

अभिनेत्यानं त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय की, “तुकाराम मुंढे साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, असं अगदी मनापासून वाटतंय म्हणजे प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही गळचेपी, ह्या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि System खऱ्या अर्थानं, “मुळापासून” स्वच्छ व्हायला सुरुवात होईल… देवेंद्र फडणवीसजी, कृपया हे करा…”, अशा आशयाची पोस्ट त्यानं लिहिली आहे. अभिजीत केळकरची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 100% सहमत, अगदी बरोबर, अशा कमेंट्स केल्या आहेत. 

दरम्यान, अभिजीत केळकरनं आजवर अनेक मराठी सिनेमे, मालिका, नाटकं आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलंय. अभिजीतला खरी ओळख 2005 मध्ये प्रसारित झालेल्या ‘ऊन पाऊस’ मालिकेतील राकेश सरदेसाई या भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’, ‘तुझं माझं जमेना’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यानं काम केलंय. याव्यतिरिक्त त्यानं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), बालगंधर्व (2011), काकस्पर्श (2012), तीचा बाप त्याचा बाप (2011) या सिनेमांमध्ये काम केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shreyas Talpade Reduced Dairy Food Intake In Diet: तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर मराठी अभिनेत्याला भरली धडकी; घरात येणारं दूध, पनीर खाणंच सोडलं, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *