Last Updated:
Pune Nilesh Ghaiwal Gang Attack : जर नागरिक गुंडाविरुद्ध पोलिसांना सहकार्य करत असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
Nilesh Ghaiwal Gang Attack : गेल्या तीन वर्षापासून पुण्यात टोळीयुद्धाचा भडका पुन्हा उडाल्याचं पहायला मिळतंय. गुन्हेगारीनं तोंड वर काढलेलं असताना आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. अशातच आता कोथरूड पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. कोथरूडमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची माहिती समोर आलीये. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.
अमितवर कोयत्याने सपासप वार
अमित शिंदे हा कोथरूडमधील एका मोबाईल दुकानात काम करत होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो दुकानाबाहेर उभा असताना अचानक आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी अमितवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला दुसर्या तिसऱ्याने गुंडाने केला असून कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील तरुणांनी केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या तरुणाने घायवळ विरोधात तक्रार दिली होती अशी माहिती समोर आली आहे.
तक्रारदाराच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
जर नागरिक गुंडाविरुद्ध पोलिसांना सहकार्य करत असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. जुन्या वादातून तरुणाला टार्गेट करण्यात आल्याने आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घायवळ टोळीचा उन्माद किती दिवस चालणार?
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये लपून बसला आहे. तिथून तो आपलं नेटवर्क चालवतोय. निलेश घायवळच्या भावाला पुणे पोलिसानी राजस्थानमधून अटक केली होती. अशातच आता निलेश घायवळ याला देखील कधी अटक होणार? असा सवाल विचारला जात आहे. तर आता घायवळ टोळीचा उन्माद किती दिवस चालणार? अशी चर्चा पुण्यात होताना दिसतीये. कोथरूड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत.
Pune,Maharashtra
Nilesh Ghaiwal : लंडनमध्ये बसून निलेश घायवळचा कोथरूडमध्ये उन्माद! 8 ते 10 जणांकडून तरुणावर कोयत्यानं हल्ला, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?
