Rohit Sharma : मैदानात उतरताच दिनेश कार्तिकने सुरू केली मस्ती, रोहितने मुंबई स्टाईलने दिलं उत्तर, Video | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांची मैत्री प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहिती आहे. रोहित शर्मा हा सध्या इंग्लंडमध्ये वनडे सीरिज खेळत आहे, तर दिनेश कार्तिक या सीरिजची कॉमेंट्री करत आहे.

मैदानात उतरताच दिनेश कार्तिकने सुरू केली मस्ती, रोहितने मुंबई स्टाईलने दिलं उत्तर, Video
मैदानात उतरताच दिनेश कार्तिकने सुरू केली मस्ती, रोहितने मुंबई स्टाईलने दिलं उत्तर, Video

बर्मिंघम : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांची मैत्री प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहिती आहे. रोहित शर्मा हा सध्या इंग्लंडमध्ये वनडे सीरिज खेळत आहे, तर दिनेश कार्तिक या सीरिजची कॉमेंट्री करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या बर्मिंघममधल्या पहिल्या वनडे मॅचआधी रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक एकमेकांना भेटले. बर्मिंघमच्या एजबॅस्टन मैदानात सामन्याच्या आधीच दोघांची भेट झाली.

रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून मैदानात येत होता तेव्हा दिनेश कार्तिक बाऊंड्री लाईनवर उभा होता. दिनेश कार्तिक रोहितला हस्तांदोलन करायला गेला. दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन केलं, यानंतर रोहित शर्माने दिनेश कार्तिकला मस्करीमध्ये लाथ मारली, यानंतर दोघंही हसायला लागले. रोहित शर्माची भेट घेतल्यानंतर दिनेश कार्तिक विराट कोहलीलाही भेटला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

रोहित शर्मा फेल

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्मा फेल गेला. 21 बॉलमध्ये फक्त 11 रन करून रोहित शर्मा आऊट झाला. सॅम करनच्या बॉलिंगवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात रोहितने बॉल हवेत उडवला यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने कॅच पकडला.

या सामन्यात इंग्लडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉर्लसनी इंग्लंडला 47.5 ओव्हरमध्ये 258 रनवर ऑलआऊट केलं. जो रूटने सर्वाधिक नाबाद 76 रन केले, याशिवाय आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या लियाम डॉसनने 68 आणि ओपनर बेन डकेटने 43 रनची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार यांना 2-2 आणि जसप्रीत बुमराह, शिवम दुबे यांना 1-1 विकेट मिळाली.

वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरू

पुढच्या वर्षी ऑक्टोबर 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यापासून टीम इंडियाच्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. या सीरिजपासूनच टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी वेगवेगळ्या टीम कॉम्बिनेशनना संधी देत आहे. वर्ल्ड कपच्या तयारीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म महत्त्वाचा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *