‘मैने प्यार किया’ नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?


Tv Actor Journey: अभिनेता सलमान खानच्या चित्रपटात कधीकाळी 50 रुपयांवर नोकराच्या भूमिका साकारणारा हा कलाकार छोट्या पडद्यावरील आता सर्वात मोठा स्टार झालाय. अक्षरशः एका पिढीला या कलाकाराने खळखळून हसवले आहे.गेल्या 16 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन हा अभिनेता करतोय. करिअरचा सुरुवातीला छोट्या-मोठ्या रोलसाठी 50- 100 रुपये कमावणारा हा अभिनेता या मालिकेसाठी जवळपास दीड लाख रुपये मानधन घेतात. ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही बोलत आहोत, तो सगळ्यांनाच कळलं असेल. जेठालालची भूमिका करणाऱ्या दिलीप जोशींची त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेली भूमिकाही या मालिकेतील आहे.

खरंतर 1989 मध्ये मैने प्यार किया या सलमान खानच्या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात त्यांच्या करिअरची सुरुवात केली.अरे छोट्या मोठ्या सिनेमांमध्ये नोकराच्या भूमिका, छोटे रोल केले, पण पहिला चित्रपटानंतर फारसं काम मिळेनासं झालं . त्यानंतर दिलीप जोशींनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आणि ट्रॅव्हल एजन्सीचं काम करण्यास सुरुवात केली.2008 मध्ये त्यांना त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठी ऑफर मिळाली. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत जेठालाल ची भूमिका मिळाली आणि त्यांचा आयुष्य बदलून गेलं. 

 

जेठालालचं टाइमिंग, मजेशीर संवाद आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण होणारा गोंधळ या सगळ्यामुळे ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली.सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या मालिकेची आजही तितकीच क्रेझ आहे.या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी ते ओळखले जातात. काही रिपोर्टनुसार ते या भूमिकेसाठी दीड लाख रुपये मानधन घेतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. विनोदी कथानक आणि लक्षवेधी पात्रांमुळे ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक तिचा मनापासून आनंद घेत आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *