DES Pune University : सदैव गतीशील राहणारे विद्यापीठ


अनेक शिक्षण संस्थांच्या माहितीपुस्तकात ‘उत्कृष्टता’ हा शब्द नेहमीच वापरला जातो पण त्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात आणण्यासाठीचे  प्रयत्न मात्र अभावानेच होतांना दिसतात. डीईएस पुणे विद्यापीठ मात्र (DES Pune University – DES PU) याला अपवाद आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीकडे धावती नजर टाकली तरी लक्षांत येईल कि ही संस्था दिखाऊ प्रचार, वारेमाप प्रचार आणि चमकदार घोषणा यांपासून लांब राहून प्रामाणिकपणे आपल्या ध्येयाशी कटिबद्ध आहे. शिक्षणाचा नेमका उद्देश काय? या मूळ प्रश्नाला भिडण्याची क्षमता या विद्यापिठात आहे आणि त्यातून शोधलेले उत्तर हे केवळ मागील पानावरुन पुढे जाणारे नसून प्रत्यक्ष वर्तमान स्थितीचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांना सर्वार्थाने सक्षम बनवणारे आहे.

दर्जेदार शिक्षण आणि राष्ट्रउभारणीच्या तत्वांवर उभ्या असलेल्या आमच्या विद्यापिठाने स्थापनेपासून एकाच प्रश्नाचा ध्यास घेतला आहे. ‘आम्ही काय शिकवतो?’ याऐवजी ‘भविष्यात प्रत्यक्ष जगात वावरण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमकी कशाची गरज  आहे?’ हा प्रश्न आम्हांला महत्त्वाचा वाटतो. या प्रश्नाचे उत्तर काहीसे सोपे असले तरी ते  प्रत्यक्षात आणणे सहज-साध्य गोष्ट नक्कीच नाही

साचेबद्ध अभयसक्रमाबाहेरील शिकवणूक

डीईएस पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणांमधील एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे इथे स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी समन्वयावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सीमारेषांमध्ये जखडण्याऐवजी इथे व्यापक आणि विस्तृत दृष्टिकोनावर भर दिला जातो. आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडून वेगवेगळ्या विद्या-शाखांशी जोडले जाणे, प्रत्यक्ष जगातील गुंतागुंतीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करणे यासाठी विद्यार्थ्यांना इथे प्रोत्साहन दिले जाते.

शैक्षणिक क्षेत्रात याला बहू-विद्याशाखीय दृष्टिकोन असे म्हंटले जाते पण खरे तर आज त्याच्याही पलीकडे जाणारा दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात इथे काय घडते? तर, विद्यापीठातील सर्व विभागांबरोबरच आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक घटकांबरोबर संपर्क साधून त्याद्वारे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. जटील समस्या आणि सतत बदलणारी उत्तरे हे आजच्या बाजारपेठांचे स्वरूप असल्याने विद्यार्थ्यांना या संपर्काचा आणि सरावाचा नक्कीच फायदा होतो. संपर्क, संवाद  आणि समन्वय यांच्या आधारे काम करणे हे आजच्या युगातील आवश्यक असे  कौशल्य बनले आहे.

बौद्धिक कुतूहल, सहकार्य आणि जुळवून घेण्याची क्षमता या गुणांना येथील शैक्षणिक धोरणांमध्ये खास प्राधान्य देण्यात आले आहे. हे गुण शिकणे कठीण आहे आणि शिकवणे त्याहून कठीण! अनेक संस्थांमधून या गोष्टीकडे  दुर्लक्ष होता असतांना आम्ही मात्र आमच्या विद्यापीठात याच शिकवणुकीला  सर्वाधिक प्राधान्य देत आहोत

उद्योगक्षेत्राला इथे दुय्यम स्थान नाही

अनेक विद्यापिठांमध्ये उद्योगक्षेत्रासोबतच्या संपर्क आणि सहकार्याला फारसे महत्व दिले जात नाही. वर्गातील पारंपरिक शिक्षणावरच  सगळा भर दिला जातो. अतिथी वक्त्यांची भाषणे, वर्षातून एखादी औद्योगिक सहल, अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रामध्ये दिली जाणारी कामचलाऊ इंटर्नशीप या पलीकडे अनेक ठिकाणी काही होत नाही. आम्ही मात्र आमच्या विद्यापीठात औद्योगिक क्षेत्राशी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत ! उद्योगक्षेत्राशी परस्परसंवाद, सातत्याने होणारी तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे, लाइव्ह प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशीप इत्यादी गोष्टी अभ्यासक्रमाशी वरवर आणि दिखाव्यापुरत्या जोडलेल्या नसून खऱ्या अर्थाने त्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. यातील तर्क अगदी साधा आहे- जे विद्यार्थी योग्य वेळी औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांशी जोडले जातात त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि सुयोग्य क्षमताही निर्माण होतात, ज्या फक्त वर्गातील शिकवण्यामधून विकसित होत नाहीत. पदवीधर विद्यार्थ्यांना काय येते आहे आणि उद्योग क्षेत्राला कशाची आवश्यकता आहे यातील दरी ही अनेक दशकांपासूनची समस्या आहे. ही दरी आपल्या बाजूने बुजवण्याचा निर्णय आमच्या विद्यापिठाने घेतला आहे.

पाच वर्षांपूर्वी उद्योगक्षेत्र कुठे होते याऐवजी ते आता कोणत्या दिशेने जात आहेत यानुसार अभ्यासक्रमात नियमितपणे बदल केले जातात. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (A.I.) बदलणाऱ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी या बदलांना कसे प्रतिसाद देतात या गोष्टीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाविन्यता हे एक पायाभूत तत्व !

आपल्या छापील माहितीपत्रकांमध्ये ‘नाविन्यता’ हा शब्द वापरायचा आणि मग तो विसरून जायचा हे अनेकदा, अनेक अनेक ठिकाणी अनुभवास येते. डीईएस पुणे विद्यापीठात मात्र शैक्षणिक धोरणाचे मूलभूत तत्वच मुळात ‘नाविन्यता’ हे आहे. इथे संशोधन हा विषय एका विशिष्ट विषयाला धरून काम करणाऱ्या वरिष्ठ शिक्षकांपुरता मर्यादित नाही. नव्याने उदयाला येणारे तंत्रज्ञान हाताळणे आणि प्रत्यक्ष समाज आणि उद्योगक्षेत्रातील आव्हानांशी सुसंगत पर्याय निर्माण करण्यासाठी इथे विद्यार्थी आणि शिक्षकांना आंतर विद्या-शाखीय संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आमच्या संस्थेत उद्योजकतेकडेही अतिशय गांभीर्याने पाहिले जाते. वर्षाच्या अखेरीस नावापुरत्या घेतल्या जाणाऱ्या ‘पिच’ स्पर्धेऐवजी इथे ‘स्टार्टअप विकास’ आणि समूह-पद्धतीने समस्येचे निराकरण करण्यासाठी उत्तम प्रकारे सहकार्य केले जाते.

या मागील उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे ! सध्याच्या जागतिक वातावरणामध्ये केवळ प्रवेश करण्यासाठी तयारी करत असणारे नाही तर भविष्याला आकार देण्यास सज्ज होणारे पदवीधर इथे घडवले जातात.

“आजघडीला असलेल्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेसाठी आम्ही पदवीधर तयार करत नाही. तर, यापुढे पंधरा वर्षांनंतरही जे सुसंगत असतील, कामाबद्दल कुतूहल बाळगतील अशी सक्रिय आणि सक्षम पिढी आम्हाला तयार करायची आहे. याचाच अर्थ, दरवर्षी एखाद्या विद्यार्थ्याच्या कामाला आम्ही ज्या चिकित्सक नजरेने पाहू तोच चिकित्सक दृष्टिकोन आम्ही आमच्या अभ्यासक्रमाबाबतही बाळगतो,” असे डीईएस पुणे विद्यापिठाच्या प्राध्यापक आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. वृषाली कुलकर्णी म्हणाल्या.

काही अंगभूत वैशिष्ट्ये

शैक्षणिक ‘परफॉर्मन्स’ मोजता येतो. करिअरमधील यश तपासता येतं. पण, विद्यार्थी कसा घडला याचा दर्जा मोजता येत नाही आणि विद्यापिठे स्वतःची जी चमकदार जाहिरात करतात त्याकडे पाहतांना नेमका हाच मुद्दा मागे पडतो.

डीईएस पुणे विद्यापिठाने विद्यार्थी विकासात सहभागी असणाऱ्या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून आपला अभ्यासक्रम ठरविण्याचा प्रयत्न कसोशीने केला आहे. शैक्षणिक यशासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, संवाद, नैतिकता, तर्कशक्ती आणि सामाजिक जबाबदारी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये बाणवले जातात. इथल्या चैतन्यमय परिसराचे त्यात साह्य लाभते. विद्यार्थ्यांनी राबवलेले उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अशा अनेक क्षमतांचा वेध घेता येतो ज्या फक्त चार भिंतीतील अभ्यासातून साध्य होत नाहीत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोणतेच प्रयत्न केवळ वरवरचे नाहीत. त्यामागे आमचा एक विचार आहे आणि दीर्घकालीन आराखडाही आहे. पदवीधर विद्यार्थ्यांच्या क्षमतांविषयी आजवर जे संशोधन झालेले आहे त्यावरून हे सातत्याने स्पष्ट झालं आहे की या प्रकारच्या एकात्मिक अभ्यासक्रमांतून विकसित झालेली वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात एक अनोखी ओळख मिळवून देतात. आमच्या विद्यापीठाच्या दृष्टिकोनाचा तोच मोठा आधार आहे !

एक दीर्घकालीन उद्दिष्ट

विद्यापीठाची उभारणी करतांना आम्ही साकल्याने विचार करून एक दीर्घकालीन उद्दिष्ट आमच्यापुढे ठेवले आहे. आज समाजाला, उद्योगांना  ज्याची  आवश्यकता आहे त्या क्षमतांना परिपूर्ण विद्यार्थी आम्हाला घडवायचे आहेतच पण त्याबरोबरीने आगामी दशकांमधील आव्हानांचा मुकाबलाही जे सहजतेने करू शकतील, आपल्या क्षमता जे कायम वाढवीत राहतील आणि मुख्य म्हणजे आपल्यावरील सामाजिक जबाबदारीचे ज्यांना नेमके भान असेल अशी सजग आणि सक्रिय नागरिकांची पिढी  आम्हाला घडवायची आहे. यासाठी लागणारा दृढ आत्मविश्वास आमच्याकडे आहेच पण त्याबरोबरीनेच नियोजन क्षमता, सकारात्मकता आणि आपल्या शैक्षणिक धोरणांचे सातत्याने विश्लेषण करून आवश्यक तेंव्हा त्यात बदल करण्याची लवचिकता ही आमची सामर्थ्यस्थळे आहेत ! 

अधिक माहितीसाठी कृपया https://www.despu.edu.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *