Last Updated:
Shilpa Shinde in Lock Upp S2: ‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने थेट टीव्हीवरील लोकप्रिय सून म्हणजेच अभिनेत्री शिवांगी जोशीच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि तिच्या वर्जिनिटीवर बोट ठेवत एक अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
मुंबई: तुरुंगाचे नियम, कैद्यांचे रूप आणि दररोज होणारे धक्कादायक खुलासे यामुळे ‘लॉक अप सीझन २’ हा रिॲलिटी शो सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत आहे. वाद आणि वादग्रस्त विधाने हे या शोचे समीकरणच बनले आहे. अशातच, शोच्या नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियाचे तापमान कमालीचे वाढवले आहे. ‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने थेट टीव्हीवरील लोकप्रिय सून म्हणजेच अभिनेत्री शिवांगी जोशीच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि तिच्या वर्जिनिटीवर बोट ठेवत एक अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रेया कालरा हिच्यासोबत मिळून शिल्पाने थेट शिवांगीची उडवलेली ही खिल्ली सध्या नेटकऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ‘लॉक अप’च्या जेलमध्ये शिवांगी जोशी आणि हर्षद चोपडा हे दोघे काही अंतरावर उभे राहून आपसात काहीतरी चर्चा करत होते. त्यांना एकत्र पाहून तिथेच बसलेल्या शिल्पा शिंदे आणि श्रेया कालरा त्यांची खिल्ली उडवू लागल्या. शिल्पाने लगेचच शिवांगीची नक्कल करायला सुरुवात केली. शिल्पा म्हणाली, “अरे यार, माझ्याकडे सांगण्यासारखं कोणतंही सीक्रेट नाहीये. मी आणखी किती नाटक करू? मी खूप इनोसंट मुलगी आहे, मला काहीही नकोय. मी अजून वर्जिन आहे आणि जे काही करायचंय ते मी थेट लग्नानंतरच करेन.”
हर्षद चोपडाचीही उडवली खिल्ली
शिल्पाचं हे बोलणं ऐकून श्रेयालाही हसू आवरलं नाही. तिनेही हर्षदची नक्कल करायला सुरूवात केली. श्रेया म्हणाली, “शिवांगी, तू नक्की काय विचार करत आहेस?” त्यावर पुन्हा शिवांगीच्या स्टाईलमध्ये उत्तर देत ती म्हणाली, “काही माहीत नाही, पण जेव्हा हे सीक्रेट सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा मला खूप हसू येईल; कारण त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नव्हतं.” या दोघी त्यांच्यावर हसत असताना आणि टोमणे मारत असताना, शिवांगीने मात्र अत्यंत संयम राखत या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.
शिल्पा शिंदेच्या वागणुकीवर चाहते संतप्त
शिल्पा शिंदेने शिवांगी जोशीला अशा प्रकारे जाहीरपणे टार्गेट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीच्या एका भागात शिल्पा जेव्हा जेलच्या कंट्रोलरच्या भूमिकेत होती, तेव्हा तिने अधिकाराचा गैरवापर करत शिवांगीला थेट हर्षद चोपडासोबत कमी बोलण्याची ऑर्डर दिली होती. त्यावेळीही प्रेक्षकांना शिल्पाचे वागणे अजिबात आवडले नव्हते. आता थेट शिवांगीच्या चारित्र्यावर आणि वर्जिनिटीवर अशा प्रकारे कॅज्युअल कमेंट केल्यामुळे शिवांगीचे चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत.
Mumbai,Maharashtra
“मी अजून वर्जिन, लग्नानंतरच…”; Lock Upp 2 मध्ये राडा, TV अभिनेत्रीची नक्कल करण शिल्पा शिंदेला पडलं महागात
