गेल्या काही काळापासून राज्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातून राजू नवघरे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. झिरवळ यांच्यासह इतरही काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.