NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर ‘ती’ एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली


NCP Crisis Sunetra Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खदखद सोमवारी उघड झाली. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachidanand singh)  यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देणारी कायदेशीर नोटीस बजावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे का, असा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव (Brijmohan Srivastava) यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना या सगळ्याबाबत भाष्य केले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संवादाची प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष खदखदत असल्याचा दावा ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केला. (Maharashtra Politics news)

सच्चिदानंद सिंह यांनी त्यांनी मला पत्र लिहलं होतं, माझ्याशीही बोललेही होते, पण मी त्यांचं समाधान करु शकलो नाही. पक्षात संवादाचा अभाव असल्यामुळे मला कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मी सच्चिदानंद सिंह यांना उत्तर देऊ शकलो नाही. सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीच्या निवडीवर उपस्थित केलेला आक्षेप योग्य आहे. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सगळेच स्वीकारतात, त्यावर कोणाला आक्षेप नाही. पण पक्षाच्या संविधानानुसार त्यांची निवड व्हावी ही मागणी आहे. सच्चिदानंद सिंह हे जबाबदार पदाधिकारी आहेत, त्यांची मागणी योग्य आहेत, असे ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटले. मी याबाबत वरिष्ठ नेत्यांशी बोलायचा प्रयत्न केला पण मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि कोणी यामध्ये खास रुची दाखवली नाही, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

Ajit Pawar news:  अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत संवादाची प्रचंड पोकळी: ब्रिजमोहन श्रीवास्तव

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात अनेक स्तरावर त्रुटी निर्माण झाल्या आहेत. अजित पवार यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. ते ज्याप्रकारे पक्षसंघटना आणि सरकार चालवायचे, ते अद्भूत होते, त्याची तुलना होऊ शकत नाही. पण अजित पवार गेल्यानंतर पक्षातील अनेक गोष्टी ठीक करायची गरज आहे. अजितदादा गेल्यानंतर पक्षात संवादाचा प्रचंड अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. संवाद नाही, आपापसात चर्चा नाही, एकमेकांशी बोलायचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते सगळं अजितदादा गेल्यानंतर थांबले आहे. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे, असे ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटले.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार आणि तटकरे-पटेलांमध्येही संवादाचा अभाव, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा दावा

सुनेत्रा पवारांच्या अधिकारात कोणीही हस्तक्षेप करत  नाही, सगळे त्यांच्यासोबत आहेत. पण पक्षातील संवादाचा अभाव संपला पाहिजे. सगळ्यांनी यावर चिंतन केलं पाहिजे. पक्षाच्या कार्यकारिणीत नव्या लोकांना संधी मिळाली आहे.  त्यांना वाटतं, सगळं ऑटो पायलट मोडवर आहे. आपोआप सगळी कामं होतात. पण संघटना चालवणं इतकं सोपं नसतं, सतत एकमेकांसी संवाद ठेवायाच असतो. हे नव्या लोकांना समजून घ्यावे लागेल. पक्ष चालवणाऱ्यांना या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यांच्याकडूनच त्रुटी आहे या सगळ्यात. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यातही संवादाचा अभाव आहे. त्याचमुळे आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर मिळाले नाही, असे ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटले.

आणखी वाचा

NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *