Alka Yagnik Anuradha Paudwal Fight: माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ गाण्यावरुन अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक यांच्यात वाद? कित्येक वर्षांपासूनचा अबोला, आजही कायम; नेमकं घडलेलं काय


Alka Yagnik Anuradha Paudwal Fight: हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) गायक आणि अभिनेते-अभिनेत्री यांच्यातील वादाच्या चर्चा काही आजच्या नाहीत, त्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अनेक वादाचे किस्से आपण ऐकतो, अशाच एका वादाची चर्चा सध्या रंगली आहे. 80-90 च्या दशकातील सुपरस्टार लेडी सिंगर अलका याज्ञिक (Singer Alka Yagnik) आणि अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांच्यातील वाद. असं म्हटलं जातं की, या दोन प्रसिद्ध गायिकांमध्ये (Bollywood Singer) मोठी चुरस रंगलेली, त्यामुळे कधीकाळी दोघींमध्ये मोठी चुरस रंगलेली. पण, नेमकं खरं काय? दोघींमध्ये खरंच वैर होतं? यावर गायिका अनुराधा पौडवाल (Singer Anuradha Paudwal) यांनी भाष्य केलंय. त्यांनी नेमक्या दोघांमध्ये वैर असल्याच्या चर्चा नेमक्या काय? यामध्ये कितपत तथ्य? यावर भाष्य केलंय. 

अनुराधा पौडवाल, अलका याग्निक यांच्यात मतभेद? (Alka Yagnik vs Anuradha Paudwal)

अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडवाल या दोघीही आपापल्या काळातील दिग्गज गायिका होत्या आणि त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली होती. मात्र, त्यांच्यातील वादाची सुरुवात एका विशिष्ट सिनेमातील गाण्यामुळे झाली होती. असं म्हटलं जातं की, अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील स्पर्धेची सुरुवात आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा समावेश असलेल्या ‘दिल’ (Dil) सिनेमापासून झाली. हा वाद काही विनाकारण सुरू झाला नव्हता, या सिनेमातील गाण्यांमुळे इतका मोठा वाद निर्माण झाला होता की, त्यात अनेक लोक सामील झाले होते. या संघर्षाचं मूळ कारण म्हणजे, सिनेमातून अलका याग्निक यांची गाणी काढून टाकणं हे होतं.

अनुराधा यांनी अलका यांची गाणी पुन्हा गायली 

1990 मधील ‘दिल’ (Dil) सिनेमातली गाणी मुळात अलका याज्ञिक यांनी गायली होती. मात्र, गुलशन कुमार हे या सिनेमांचे निर्माते असल्यानं, कराराच्या अटींमुळे अनुराधा पौडवाल यांनी तीच गाणी स्वतःच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड केली. अनुराधा पौडवाल यांनी अलीकडेच शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना या विषयावर मोकळेपणानं भाष्य केलंय.

त्या काळात, कॉन्ट्रॅक्टमधील अटींमुळे अनुराधा पौडवाल केवळ ‘टी-सीरीज’च्या (T-Series) सिनेमांसाठीच गाणी गात होत्या. परिणामी, गुलशन कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी या सिनेमातील दोन गाणी पुन्हा रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे, अलका यांनी आधीत ती गाणी गायलेली, पण तीच गाणी अनुराधा यांनी पुन्हा गायली आणि ही गाणी सुपरहिट ठरली. खुद्द गुलशन कुमार यांनी अनुराधा यांनी गायलेली गाणी प्रमोट केलेली.

आजही दोघींमध्ये वैर? (Fight Between Anuradha Paudwal And Alka Yagnik?)

‘दिल’ सिनेमातलं गाणं ‘मुझे नींद ना आए’ (Mujhe Neend Na Aaye) हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. मूळात अलका याज्ञिक यांनी गायलेली गाणी अनुराधा पौडवाल यांनी पुन्हा रेकॉर्ड केल्यामुळे अलका यांना खूप वाईट वाटलेलं. या गोष्टींमुळे त्यांची नाराजी कुमार सानू आणि उदित नारायण यांच्यावरही ओढवली होती.

1997 मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत अलका याज्ञिक यांनी सांगितलं की, जेव्हा पहिल्यांदा असं घडलं तेव्हा त्या शांत राहिल्या होत्या, पण ‘इतिहास’ (Itihaas) सिनेमाच्या वेळीही तीच घटना पुन्हा घडली. त्यानंतर, आपल्या नकळत अनुराधा यांनी आपण गायलेली गाणी डब करून रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली.

असं म्हटलं जातं की, या घटनेनंतर अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्यात क्वचितच संवाद होत असे. आजही या दोन्ही गायिकांमधील वाद कायम आहे. तरीही, अलीकडील एका पॉडकास्टमध्ये अनुराधा यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केलंय की, करारातील अटींमुळे (Contractual Obligations) त्यांना असं करावं लागलेलं. तसेच, अलका यांनी गायलेल्या काही गाण्यांबद्दल आपल्याला खूप आदर असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hema Malini On Her Biopic: ना ईशा देओल, ना आलिया भट्ट; हेमा मालिनी यांच्या बायोपिकमध्ये कोण झळकणार? 1000 कोटींच्या 3 सुपरहिट फिल्म्स देणारी ‘ही’ लेडी सुपरस्टार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *