Last Updated:
शॉर्ट टर्मिनेशनचा कालावधी वाढवला आहे. हा कालावधी 31 जुलै 2026 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असं मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.
मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकावर सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामामुळे मध्य रेल्वेने काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशनचा कालावधी वाढवला आहे. हा कालावधी 31 जुलै 2026 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असं मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.
मध्य रेल्वेमार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. शॉर्ट टर्मिनेशन केल्या गेलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना आता प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. या गाड्या ठाणे आणि दादर पर्यंतच धावणार आहेत.
गाडी क्रमांक 22120 मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस ही 29 जुलै 2026 पर्यंत दादर स्थानकावरच प्रवास समाप्त करेल.
गाडी क्रमांक 12134 मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ही 30 जुलै 2026 पर्यंत ठाणे स्थानकावरच प्रवास समाप्त करेल.
मध्य रेल्वेने प्रवाशांना या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. या बदलामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Mumbai,Maharashtra
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामामुळे मध्य रेल्वेकडून गाड्या शॉर्ट टर्मिनेशन, चेक करा यादी
