नेहमीप्रमाणे आपल्या बिनधास्त शैलीत बोलताना गोविंदाने काही धक्कादायक विधानेही केली. तो म्हणाला, “मी जेव्हा एखाद्या चित्रपटात काम करतो, तेव्हा अख्खी दुनिया थक्क होते की हा माणूस इथे कसा पोहोचला? मला आता कशाचीही भीती वाटत नाही आणि मी सत्यापासून कधीच पळ काढत नाही. माझ्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, याचा पूर्वभास मला खूप आधीच होतो. मी जेव्हा लोकांना हे सत्य सांगतो, तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही. अनेक लोक तर मला उलट-सुलट बोलतात, अगदी शिव्याही देतात; पण मला त्याची फिकीर नाही.”
