Belly Fat : व्यायामानं कमी करा पोटावरची चरबी, योग्य व्यायाम, सातत्य राखल्यानं कमी होईल पोटाचा घेर | लाइफस्टाईल बातम्या


बैठी जीवनशैलीमुळे सध्या पोटावरची अतिरिक्त चरबी या समस्येचं प्रमाण वाढत चाललंय. पोटावर चरबी साचल्यानं केवळ व्यक्तीच्या दिसण्यावरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे मधुमेहासारखे विविध आजारही उद्भवू शकतात; म्हणूनच चरबी कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

योग्य व्यायाम आणि सातत्याच्या जोरावर पोटावरची चरबी कमी करता येते. व्यायामाची सुरुवात करत असाल, तर साध्या आणि उपयुक्त व्यायामांपासून सुरुवात करता येईल.

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त व्यायाम –

चालणं – चालणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. वीस ते तीस मिनिटं वेगानं चालल्यानं कॅलरीज खर्च होतात आणि हळूहळू पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

प्लँक – Plank – शरीराच्या मध्यभागातील स्नायू म्हणजेच कोर मसल्स मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. सुरुवातीला दहा ते पंधरा सेकंद प्लँकच्या स्थितीत राहा आणि हळूहळू हा कालावधी वाढवा. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी व्यायाम आहे.

क्रंचेस – Crunches – क्रंचेसचा थेट परिणाम पोटाच्या स्नायूंवर होतो. सुरुवातीला दहा ते बारा वेळा हा व्यायाम करा आणि हळूहळू त्याची संख्या वाढवा.

लेग रेझेस – Leg Raises – या व्यायामामधे पाठीवर झोपून पाय वरच्या दिशेला उचलता. यामुळे पोटाच्या खालच्या स्नायूंवर म्हणजेच lower abs काम होते आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.

दोरीवरच्या उड्या – Jump Rope – घरीच व्यायाम करायचा असेल, तर दोरीवरच्या उड्या मारणं हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. दररोज पाच ते दहा मिनिटांनी याची सुरुवात करा.

माउंटन क्लायंबर्स – Mountain Climbers – हा संपूर्ण शरीराचा व्यायाम full-body workout आहे; यामुळे कॅलरीज वेगानं जळतात आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.

सायकलिंग – सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम विशेष फायदेशीर आहे. यासाठी साधी सायकल किंवा स्टेशनरी सायकल म्हणजेच एकाच जागी राहून चालवता येणारी सायकल वापरू शकता.

महत्त्वाच्या टिप्स:

– हळूहळू सुरुवात करा; अगदी सुरुवातीलाच शरीरावर अति ताण देऊ नका.

– दररोज किमान वीस-तीस मिनिटं सक्रिय राहा.

– व्यायामासोबतच संतुलित आहार घ्या.

– शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखा आणि पुरेशी झोप घ्या.

– सातत्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *