Anuradha Paudwal: माझ्या मनात, म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत खूप होतं की, अरे आपण ‘विश्वगुरू’ बनू, पण आता मी पाहतोय की विश्वगुरू या कल्पनेच्या अगदी उलट गोष्टी जास्त घडत आहेत. त्यामुळे एकतर आपण ‘विश्वगुरू-विश्वगुरू’ असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग हा सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. अनुराधा पौडवाल यांनी एका पाॅडकास्टमध्ये थेट मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितले की, मला हेच समजत नाही की जर आपल्याला सुशिक्षित असायला हवं, तर मग जवळपास 93 हजार किंवा लाख, माहिती नाही किती शाळा तर बंद पडल्या आहेत, मग विश्वगुरूचा जो पाया आहे, म्हणजे जो बेस आहे, तो नेमका काय आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
फक्त स्वप्नांच्या जीवावर तर तुम्ही चालू शकत नाही
त्यांनी पुढे सांगितले की, फक्त स्वप्नांच्या जीवावर तर तुम्ही चाल नाही शकत, तुमच्याकडे काहीतरी असायला हवं ना? की ही ठोस गोष्ट माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितले की, बरं, बरं, राम राज्य हो, पण इथे तर राम मंदिरावरच, असा उल्लेख करत राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लुटीवर अप्रत्यक्ष भाष्य केल. अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, विश्वगुरू असण्यावर माझा काही आक्षेप नाही, पण विश्वगुरू बनण्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या आहेत? कमीत कमी त्याची एक यादी तरी द्या, जेणेकरून आपण त्या मार्गावर चालू शकू, असे त्यांनी सांगितले.
अनुराधा पौडवाल कोण आहेत?
- अनुराधा पौडवाल या भारतातील सर्वात लोकप्रिय पार्श्वगायिकांपैकी एक आहेत. त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये हजारो गाणी, तसेच भजने, भक्तीगीते आणि अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
- 1980 आणि 1990 च्या दशकात, त्यांनी ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’, ‘बेटा’ आणि ‘हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली.
- चित्रपटांतील गाण्यांव्यतिरिक्त, त्यांचे ‘शिव अमृतवाणी’, ‘हनुमान अमृतवाणी’ आणि ‘देवी-भक्ती गीत’ यांसारखे भजन अल्बम देशभरात प्रचंड लोकप्रिय झाले.
- त्यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, अनेक राज्यस्तरीय सन्मान आणि 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से