‘सर्किट’ने 14 वर्षांनंतर विकलं दुकान; कमावला तीन पटींहून अधिक नफा, अर्शद वारसीकडे कोट्यवधींची संपत्ती – Marathi News | Arshad warsi sells his commercial shop for over 6 crores in andheri munnabhai mbbs actor property net worth


‘प्रीतम अँड पेड्रो’ या वेब सीरिज आणि ‘धमाल 4’ या चित्रपटात दमदार कामगिरी करत प्रेक्षकांकडून कौतुक मिळवणारा अभिनेता अर्शद वारसी सध्या यशाच्या शिखरावर आहे. यादरम्यान त्याने मुंबईतील त्याचं अनेक वर्षांपूर्वीचं जुनं दुकान विकून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला आहे. ‘लियासेस फोर्स’ने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांवरून दिलेल्या माहितीनुसार, अर्शद वारसीने मुंबईतील अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स इथलं दुकान तब्बल 6.25 कोटी रुपयांना विकलं आहे. अर्शदने 2012 मध्ये 2.12 कोटींहून अधिक रुपयांना हे दुकान विकत घेतलं होतं. म्हणजेच आता अर्शदला त्याचं दुकान विकून तीन पटींनी अधिक नफा झाला आहे. त्याचं हे दुकान लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या ‘ग्रेनविले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंह सोसायटी लिमिटेड’च्या तळमजल्यावर आहे. या दुकानाचा कार्पेट एरिया 684 चौरस फूट आहे.

14 वर्षांपूर्वी विकत घेतलं होतं दुकान

अर्शद वारसीने जेव्हा 14 वर्षांपूर्वी हे कमर्शियल दुकान विकत घेतलं होतं, तेव्हा त्यासाठी त्याने 30 हजार रुपयांची रजिस्ट्रेशन फी आणि 10 लाख रुपयांहून अधिक स्टँप ड्युटी भरली होती. अर्शद वारसीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबईतील वर्सोवा इथं त्याचा आलिशान बंगला असून त्याची कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत आहे. याशिवाय उत्तर गोवामध्ये त्याला 150 वर्षे जुना पोर्तुगाली व्हिलासुद्धा आहे. ‘कासा जेन’ असं या व्हिलाचं नाव आहे. अर्शदने या व्हिलाचं नुतनीकरण केलं असून आता तो हॉलिडे स्टे म्हणून वापरला जातो. या व्हिलामध्ये राहायचं असेल तर पर्यटकांना एका रात्रासाठी तब्बल 75 रुपये भाडं भरावं लागतं.

दमदार मानधन

अर्शद वारसीने बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगवेगळ्या भूमिका साकारून आपली ओळख निर्माण केली आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही वेब सीरिज आणि ‘धमाल 4’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. याशिवाय तो अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या कॉमेडी चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटांसाठी त्याने दमदार मानधन स्वीकारल्याचं कळतंय. ‘प्रीतम अँड पेड्रो’साठी त्याने तीन कोटी रुपये फी स्वीकारली आहे, तर ‘धमाल 4’साठी त्याला दहा कोटी रुपये मानधन मिळालं आहे. ‘वेलकम टू द जंगल’साठी त्याने चार कोटी रुपये घेतले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अर्शद वारसीकडे तब्बल 341 कोटी रुपयांची संपत्ती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *