Anil Patil on Sharad Pawar Eknath Shinde Meeting: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात झालेली अचानक भेट सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, चालू असलेली मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षातील आमदार अनिल पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
“महाविकास आघाडीमध्ये (MVA) बिघाडी झाली म्हणून किंवा त्यांना एनडीएला (NDA) समर्थन द्यायचे असेल म्हणून शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीसाठी गेल्याची शंका आहे,” असा थेट संशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी बोलून दाखवला आहे.
Anil Patil on Sharad Pawar Eknath Shinde Meeting नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?
अनिल पाटील म्हणाले की, ही भेट अचानक झाली, मात्र शेवटी शरद पवार साहेब हे एकनाथ शिंदे यांच्याकडे का गेले, याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पवार साहेब त्यांच्याकडे का गेले? महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे म्हणून पवार साहेब गेले का? की त्यांना एनडीएला समर्थन द्यायचे आहे? अशा अनेक शंका आहेत. ‘इंडिया’ आघाडीमधून बाहेर पडून एनडीएमध्ये येण्यासाठी शरद पवार साहेबांना केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय पक्ष यांच्यासोबत चर्चा करावी लागेल.
पूर्वी 2014 मध्ये एनडीएमध्ये जाण्यासाठी जेव्हा समर्थन दिले होते, त्यावेळी काय झाले? तसेच 2017 मध्ये एनडीएमध्ये जाण्यासाठी शरद पवार साहेबांनी जी चर्चा केली होती, त्यावेळी नक्की काय झाले? या सर्व पार्श्वभूमीचा आणि इतिहासाच्या संदर्भात आज एनडीए मधील सर्व घटक पक्ष विचार करत असतील. हे समर्थन घेणाऱ्याला आणि समर्थन देणाऱ्यालाच याबाबत पूर्ण माहिती असेल; आम्हाला मात्र महायुतीमध्ये जो कोणी येत असेल त्याचे स्वागतच आहे,” असे त्यांनी म्हटले.
Anil Patil: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अनिल पाटील म्हणाले…
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत हा निर्णय कोणताही सामान्य कार्यकर्ता घेणार नाही, तर हा निर्णय खऱ्या अर्थाने पवार कुटुंबीयांना घ्यायचा आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता हा पवार कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करतो, त्यामुळे या संदर्भात सुनेत्रा पवार जो काही निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम राहील,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से