Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?


Maharashtra Weather Updates: दोन दिवसांपूर्वीपर्यंत उत्तर भारतातील राज्यांमध्ये धुमाकूळ घालणारा मान्सूनचा (Maharashtra Weather Updates) पाऊस पुन्हा एकदा ओसरताना दिसत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाची कोणतीही चिन्हे नाहीत, तर मान्सूनचा हंगाम असूनही राजस्थानच्या बहुतांश भागात कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने 14 राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, पुढील 12 तासांत वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मान्सूनचा पट्टा सध्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशपासून मणिपूरपर्यंत विस्तारलेला आहे. याव्यतिरिक्त, उत्तर बांगलादेश आणि लगतच्या भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण झाली असून, ती समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत विस्तारलेली आहे. पुढील 2-3 दिवसांत ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच वेळी, पुढील 4-5 दिवसांत पूर्व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Updates)

14 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा- (Weather Updates)

हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. 

मच्छीमारांनाही इशारा- (Rain Marathi News)

हवामान विभागाने अरबी समुद्रातील मच्छीमारांसाठीही इशारा जारी केला आहे. 15 जुलैपर्यंत पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या काही भागांत ताशी 55 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मासेमारांना समुद्रात जाताना अत्यंत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IMD ने वायव्य, पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 6-7 दिवस मान्सूनचा टप्पा कमकुवत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाची विश्रांती- (Maharashtra Rain Updates)

हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. घाटमाथ्यावर 500 मिलिमीटर वरून पाऊस थेट शून्यावर आला आहे. पुढील पाच-सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही. गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार बरसलेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी 500 ते 600 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र,गेल्या 48 तासांत या भागातील बहुतांश भागांत पावसाची नोंद थेट शून्यावर आली आहे. ही परिस्थिती अनपेक्षित नसून, विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. याआधी सलग चार ते पाच दिवस घाट परिसरातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

El Nino vs Mumbai Rain : एल निनो असूनही मुंबईत मुसळधार पाऊस का पडतोय? समजून घ्या यामागचं ‘शॉक’ करणारं विज्ञान आणि IOD कनेक्शन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *