Rahul Dravid : राहुल द्रविड लवकरच बनू शकतात क्रिकेट विश्वातील एक मोठ्या टीमचे कोच, त्यांचं नाव आघाडीवर – Marathi News | Rahul dravid among the contenders to be england test team next coach Brendon McCullum removed


कसोटी क्रिकेटमधील खराब प्रदर्शनामुळे ब्रँडन मॅकुलम यांना इंग्लंडच्या कोच पदावरुन हटवण्यात आलं आहे. आता त्या पदासाठी भारताचे महान खेळाडू राहुल द्रविड यांचं नाव चर्चेत आहे. इंग्लंडचे माजी कोच अँडी फ्लॉवर, इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज रिचर्ड डॉसन यांच्यासह राहुल द्रविडचं नाव सुद्धा त्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आहे. ‘डेली टेलीग्राफ’ने हे वृत्त दिलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंड टीमचा 1-2 असा पराभव झाला. या पराभवासह मॅकुलमचा चार वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या Ashes सीरीजआधी बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे असं मानून इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने मॅकुलमला हटवण्याचा निर्णय घेतला. मॅकुलम यांना फक्त टेस्टच्या टीमच्या कोच पदावरुन हटवलं आहे. इंग्लंडच्या वनडे आणि टी20 टीमच्या कोचपदी ते कायम असतील.

राहुल द्रविड यांचं वय आता 53 वर्ष आहे. त्यांच्याकडे टीम इंडियाच्या हेड कोच पदाचा अनुभव आहे. राहुल द्रविड कोच असतानाच टीम इंडियाने 2024 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली. 2023 मध्येच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली. राहुल द्रविड शांत, संयमी स्वभावाचे आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि खेळाची खोलवर असलेली समज यामुळे ते पदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहेत. राहुल द्रविड यांची पूर्णवेळ कोचिंगची अजिबात इच्छा नाहीय असं सुद्धा वर्तमानपत्राने म्हटलं आहे.

राहुल द्रविड यांच्यासह शर्यतीत अजून कोण

“द्रविड यांना पूर्णवेळ कोचिंगची इच्छा नाहीय. इंग्लंडच्या टेस्ट टीमचे कोच बनल्यामुळे त्यांना घरी जास्त वेळ देता येईल. खेळाचा आवडता फॉर्मेट जिवंत ठेवण्यासाठी मदत करण्याची संधी मिळेल” असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. झिम्बाब्वेचे महान खेळाडू अँडी फ्लॉवर सुद्धा इंग्लंड टेस्ट टीमचे कोच बनण्याच्या शर्यतीत आहेत. त्यांच्याकडे इंग्लंडच कोचपद यशस्वीरित्या संभाळण्याचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड टीमने तीनवेळा Ashes सीरीज जिंकली. टेस्ट रँकिंगमध्ये टीम नंबर 1 पदापर्यंत पोहोचली. ते आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कोच आहेत. RCB ने सलग दोनवेळा किताब जिंकला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *