जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पण इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी विराट फिट झाला आहे, त्यामुळे तो आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांना बऱ्याच महिन्यांनंतर विराट कोहली आणि रोहित शर्माला एकत्र खेळताना पाहता येणार आहे.
बुमराहचंही टीम इंडियात कमबॅक
टीम इंडियाचा दिग्गज फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह याचंही भारताच्या वनडे टीममध्ये कमबॅक झालं आहे. जसप्रीत बुमराह हा 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलनंतर पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या फायनलनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच वनडे फॉरमॅटमध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत.
भारत-इंग्लंड वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, 14 जुलै- एजबॅस्टन, भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता
दुसरी वनडे, 16 जुलै- कार्डिफ, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता
तिसरी वनडे, 19 जुलै- लॉर्ड्स, भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता
कुठे पाहता येणार वनडे सीरिज?
भारत आणि इंग्लंड यांच्यातली वनडे सीरिज टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर मोबाईल आणि वेबसाईटवर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियोहॉटस्टारवर पाहता येईल.
भारताची वनडे टीम
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल, इशान किशन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव