शैलेश यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी स्वाती लोढा या अभिनयक्षेत्रात काम करत नाहीत. त्या प्रसिद्ध मॅनेजमेंट एक्सपर्ट, मोटिव्हेशनल स्पीकर आणि लेखिका आहेत. आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी महिला सक्षमीकरण, पालकत्व, व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत.