Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ


Beed Crime News: बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवारी रात्री एका 23 वर्षीय तरुणाला दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. या भीषण हल्ल्यात मृत तरुणाचा मित्रही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Beed Crime News: दुचाकी अडवून विटा-दगडांनी अमानुष हल्ला

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे (23 वर्ष, रा. पट्टीवडगाव) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री ज्ञानेश्वर हा आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगावच्या दिशेने चालला होता. ते घाटनांदूरमधील अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचले असता, काही अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अचानक थांबवली. काही समजण्याच्या आतच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर दगड आणि विटांनी अमानुष हल्ला चढवला.

Beed Crime News: मित्राची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरू

या भीषण आणि अचानक झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यामुळे ज्ञानेश्वर वाकडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Beed Crime News: पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

दरम्यान, हा जीवघेणा आणि टोकाचा हल्ला नेमक्या कोणत्या जुन्या वादातून किंवा कोणत्या कारणावरून करण्यात आला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत ज्ञानेश्वरच्या नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या थरारक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Beed FDA Raid: सावधान! तुम्ही खात असलेला खवा, पनीर विष तर नाही? बीडमध्ये सॅफोलाइट रसायनाची भेसळ, तुकाराम मुंढेंच्या कारवाईत खळबळजनक प्रकार उघड

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला; गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं, विनायक राऊतांबाबत म्हणाल्या…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *