Last Updated:
Argentina Eliminate Switzerland Breel Embolo Red Card : रेफरींनी स्वित्झर्लंडचा स्टार स्ट्रायकर ब्रील एम्बोलो याला थेट ‘रेड कार्ड’ दाखवून मैदाबाहेर जाण्याचा आदेश दिला. एम्बोलो याला रेड कार्ड दिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
Argentina into the Semi Final : FIFA वर्ल्ड कप 2026 च्या क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यात रोमांचक सामना पहायला मिळाला. तगड्या अर्जेंटिनाला स्वित्झर्लँडने कडवी टक्कर दिली अन् मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये न्यावी लागली. हा सामना एका अत्यंत रोमांचक आणि नाट्यमय वळणावर पोहोचला, जेव्हा रेफरीने अर्जेंटिनाविरुद्ध घेतलेल्या VAR वर चक्क स्वित्झर्लँडला रेड कार्ड दिलं. पण अखेर 10 खेळाडूंसोबत खेळणाऱ्या स्वित्झर्लँडला 3-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. एक्स्ट्रा टाईममध्ये अर्जेंटिनाने अफलातून खेळ दाखवला अन् दोन गोल नावावर केले. पण 70 व्या मिनिटाला काय झालं होतं? जाणून घ्या.
अर्जेंटिनाला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी
मॅचच्या सुरुवातीला अर्जेंटिनाने आपला दबदबा निर्माण केला होता. पहिल्या हाफमध्ये 10 व्या मिनिटाला स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने घेतलेल्या कॉर्नरवर अलेक्सिस मॅक एलिस्टर याने अप्रतिम हेडर मारत अर्जेंटिनाला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. या गोलनंतर बॅकफूटवर गेलेला स्वित्झर्लंडचा संघ मॅचमध्ये बरोबरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिला, परंतु पहिल्या हाफमध्ये त्यांना अर्जेंटिनाची मजबूत डिफेंन्स लाईन भेदण्यात यश आलं नाही.
67 व्या मिनिटाला गोल अन्…
सेकंड हाफमध्ये स्वित्झर्लंडच्या आक्रमकतेला अखेर यश आलं आणि मॅचच्या 67 व्या मिनिटाला त्यांनी अर्जेंटिनाला चोख प्रत्युत्तर दिलं. रिकार्डो रोड्रिगेझ याने पेनल्टी बॉक्सच्या आत एक सुरेख आणि अचूक पास दिला, ज्यावर डॅन नडोये याने कोणतीही चूक न करता अप्रतिम फिनिशिंग केली. नडोयेने मारलेला हा शानदार शॉट अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझ याला चकवून थेट नेटच्या खालच्या कोपऱ्यात गेला आणि या गोलसह स्वित्झर्लंडने मॅच 1-1 अशा बरोबरीवर आणली. त्यानंतर खरा वाद सुरू झाला.
ब्रील एम्बोलो याला ‘रेड कार्ड’
अवघ्या 3 मिनिटांनंतर म्हणजेच 70 व्या मिनिटाला टीमला मोठा धक्का बसला. मैदानावर घडलेल्या एका घटनेनंतर VAR ची मदत घेण्यात आली आणि संपूर्ण घटना चेक केल्यानंतर रेफरींनी स्वित्झर्लंडचा स्टार स्ट्रायकर ब्रील एम्बोलो याला थेट ‘रेड कार्ड’ दाखवून मैदाबाहेर जाण्याचा आदेश दिला. एम्बोलो याला रेड कार्ड दिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रेफरीने अर्जेंटिनाविरुद्घ VAR घेतला अन् त्यांच्या बाजूने कौल दिल्याने अनेकांना धक्काच बसला.
112 व्या मिनिटाला गोल
रेफरीच्या निर्णय झाल्यानंतर ब्रील एम्बोलो कमालीचा भावूक झालेला पाहायला मिळाला. भर मैदानातून बाहेर पडावे लागत असल्यामुळे आणि आपल्या चुकीमुळे टीम 10 खेळाडूंसह खेळणार या विचाराने एम्बोलोच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर त्याने पाणवलेल्या डोळ्यांनी मैदान सोडलं. पण अर्जेंटिनाने यानंतर कोणतीही चूक केली नाही अन् बॉलवर ताबा मिळवला. त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये ज्युलियन अल्वारेझ याने 112 व्या मिनिटाला गोल केला अन् अर्जेंटिनाने सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर लॉटारो मार्टिनेझ याने 120 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला अन् अर्जेंटिनाने मॅच आपल्या पारड्यात टाकली.
Mumbai,Maharashtra
Argentina vs Switzerland : स्विट्जरलँडचा गोल अन् पुढच्या 3 मिनिटात रेड कार्ड! रेफरीची पुन्हा चिटिंग? मोठ्या राड्यानंतर अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
