Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी…बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO


Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दिवे घाटातून 33 ते 35 किलोमीटरचे अंतर पार करत सासवडमध्ये दाखल झाली आहे. पालखीचा आजचा मुक्कामही सासवडमध्येच असणार आहे. काल एकादशी (Pandharpur Ashadhi Wari 2026) असल्यामुळे वारकऱ्यांचा उपवास असतो अशा परिस्थितीत वारकरी दिवे घाट पार करीत वारकरी सासवडमध्ये पोहोचले. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video)

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडकडे रवाना होताना दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. हिरवागार घाट आणि वारकऱ्यांची गर्दी मन मोहून टाकणारी आहे. पालखीसोबत दिवे घाट पार करणं वारकऱ्यांसाठी मोठ्या कसरतीचं काम असतं. दिवे घाट फक्त वारकऱ्यांसाठीच नाही तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाला ओढणाऱ्या बैलजोड्यांसाठीही कठीण आहे. 7 बैलजोड्यांसह संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातून मार्गस्थ झाली. यादरम्यानचे दिवे घाटातील अविस्मरणीय क्षणाचे व्हिडीओ समोर आले आहेत. (Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat)

दिवेघाटाचा खडतर चढ पार; संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे रवाना, VIDEO: 

संबंधित बातमी:

Sant Dnyaneshwar Palkhi 2026: झाला देव वारकरी…बघं वारी आली दारी; संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, PHOTO





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *