Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी गावातील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण या विद्यार्थ्याने घरात बसून मोबाईलवर चोरी करणाऱ्या चोराचा व्हिडिओ चित्रित केला आहे. सर्वेश मायंगडे असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे घरात चोरी करणारा चोराला पडकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
रत्नागिरी पोलिसांनी केला विद्यार्थ्यांचा गौरव
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातल्या जाकादेवी गावात ही घटना घडली आहे. चोरी झालेल्या गावापासून मुंबई गोवा हायवे वर असलेल्या निवळी गावापर्यंत चोराचा पाठलाग करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्याने घरात बसून मोबाईलवर चोरी करणाऱ्या चोराचा व्हिडिओ चित्रित केला आहे. या आधारे पोलिसांनी कारवाई केली. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे. या विद्यार्थ्याला 5 हजार रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं आहे.
पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक
रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय जाकादेवी येथील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या तसेच तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे यांनी चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते कौतुकाची थाप देण्यात आली आहे. या धाडसी व जिज्ञासू विद्यार्थ्याला ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत प्रशस्तीपत्र व रोख रक्कम पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी तरवळ मायंगडेवाडी येथील एका घरात चोर घुसून चोरी करत असल्याचे सर्वेशच्या दृष्टीस आले. त्यानंतर सर्वेशने मोठ्या कौशल्याने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या चोराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून चोरी झालेल्या मालकाला फोनवरती माहिती देऊन त्या चोराचा मोटर सायकलवरून घर मालकासमवेत धैयाने पाठलाग करत निवळी येथे गाठले. चोरी करणाऱ्या व्यक्तीला विचारले तू कोठे जात आहेस? तो बोलला हातखंबा या ठिकाणी एका माणसाला भेटायला चाललो आहे. सर्वेशचे एवढे धाडस की, जीवाची पर्वा न करता मी पण येतो असे सांगून त्या चोराच्या मोटरसायकलवर बसला. मागोमाग ज्यांच्या घरी चोरी झाली ती व्यक्ती होती. हातखंबा गाव संपल्यावर चोराने कु सर्वेशला हळूच गाडीवरून खाली ढकळून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वेश मायंगडे याने नजिकच्या हातखंबा ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांच्या सदर चोरीची बाब निदर्शनास आणून देत पुरावा सादर केला. या चोराने सुमारे दोन घरांतून सुमारे 43 हजारांची रोकड लंपास केली होती.ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर चोराला पकडून ताब्यात घेतले.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा