Raigad Accident News : रायगड जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. माणगांव दिघी मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. तर भिवंडीत देखील भीषण अपघाताची घटना घडली आहे. रामनगर परिसरात चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड येथे एका डंपरने चिमुकलीला चिरडल्याची घटना घडली आहे.
जखमींना उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले
माणगांव दिघी मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. माणगांव नजीक निलगुण गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल केले आहे.
भिवंडीत भीषण अपघात, डंपरने चिमुकलीला चिरडल्याची घटना
भिवंडी देखील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील रामनगर परिसरात चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड येथे डंपरने चिमुकलीला चिरडल्याची घटना घडली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या चिमूरडीला कचरा उचलणाऱ्या डंपरने चिरडले आहे. या अपघातात चार वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डम्पिंग ग्राउंड येथील केबिन व डंपर जाळले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ