Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, आता जुलै (July 2026) महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच दुसरा आठवडा सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 13 ते 19 जुलै असा जुलै महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग (Yog) निर्माण होणार आहे. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, मेष राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा लाभदायी असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल. तसेच, उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट तुम्हाला चांगला मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगले संबंध निर्माण कराल. घरातील वातावरण आनंदी असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी 13 ते 19 जुलै 2026 चा कालावधी शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा प्रगतीचा असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाची साधने निर्माण होतील. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. जर तुम्हाला नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर तुम्ही करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी येणारा नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. या काळात तुमच्यात सकारात्मक दृष्टीकोन दिसून येईल. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळले. हातात घेतलेलं कार्य निर्विघ्न पार पडेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार चांगला वाढलेला दिसेल. काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Shani Gochar 2026 : सावधान…सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, ‘हा’ उपाय ठरेल फायदेशीर