IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं! – Marathi News | Did Gautam Gambhir scold Vaibhav Sooryavanshi He lashed out after the youngster failed in the third match


IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!Image Credit source: PTI

आयपीएल स्पर्धेत आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यात अखेर संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचं पदार्पण झालं असून तीन सामने खेळला आहे. मात्र तिन्ही सामन्यात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. वैभव सूर्यवंशीने तीन सामन्यात अनुक्रमे 14, 13 आणि 15 अशा धावा केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वैभव सूर्यवंशीची सुरूवात पाहून काही जाणकारांनी सामान्य प्रक्रिया असल्याचं सांगत टीका टाळली आहे. तर काही जाणकारांच्या मते, युवा खेळाडूला घाई गडबडीत संघात संधी दिली गेली आहे, असं म्हणणं मांडलं आहे. दुसरीकडे, खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीसह संघाच्या खेळीवर गौतम गंभीर नाराज असल्याची चर्चा आहे. चौथ्या टी20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला समज दिल्याची चर्चा आहे. डगआऊट जवळ त्यांच्या हावभावावरून सोशल मीडियावर हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांपेक्षा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडियावर काहीही वावड्या उठल्या तरी प्रत्यक्षात मैदानात काय करायचं हे त्यांच्या हातात असतं. त्यामुळेच ब्रिस्टलमधील चौथ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर खूश नसल्याचं बोललं जात आहे. मुक्त पत्रकार अंकन कारच्या एका रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने मैदानात वैभव सूर्यवंशीसोबत जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चा केली.

रिपोर्टनुसार, सामना संपल्यानंतर जेव्हा प्रेजेंटेशन सुरू होतं तेव्हा भारतीय संघाच्या डगआऊटमध्ये गंभीर आणि वैभव यांच्यात चर्चा सुरू होती. ही चर्चा नाही तर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापल्याचं त्याच्या हावभावावरून दिसत होतं. गौतम गंभीर संतापून वैभव सूर्यवंशीला काही तरी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याचा चेहरा आणि हावभावावरून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता शेवटच्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? तसेच या संधीचं सोनं वैभव करणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *