Vaibhav Sooryavanshi : 14,13,15…खराब कामगिरीनंतर ‘बेबी बॉस’ची गंभीरने घेतली शाळा, VIDEO VIRAL | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर वैभव सूर्यवंशीची शाळा घेताना दिसला आहे.

Gautam Gambhir long chat with Vaibhav Sooryavanshi
Gautam Gambhir long chat with Vaibhav Sooryavanshi

Gautam Gambhir chat with Vaibhav Sooryavanshi : पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतला शेवटचा सामना उद्या शनिवारी 11 जुलै 2026 ला खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला स्वत:ला क्लिन स्विप होण्यापासून रोखायचे आहे. तर इंग्लंड भारताविरूद्ध क्लिन स्विप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. पण या सामन्याआधी टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर वैभव सूर्यवंशीची शाळा घेताना दिसला आहे.

खरं तर ही घटना चौथ्या टी20 सामन्यानंतरची आहे.या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरूद्द 9 विकेटने सामना जिंकला होता.हा पराभव टीम इंडियाच्या मुख्यकोच गौतम गंभीरच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्याने कोणताही वेळ न घालवता थेट स्टेडिअमध्ये खेळाडूंची शाळा घ्यायला सूरूवात केली. पहिल्यांदा गौतम गंभीरने कॅप्टन श्रेयस अय्यरसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर गौतम गंभीर वैभव सू्र्यवंशीची शाळा घेताना दिसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता गौतम गंभीर आणि सितांशु कोटक बसले आहेत. आणि त्यांच्यासमोर वैभव सूर्यवंशी बसला आहे.यावेळी गौतम गंभीर वैभव सूर्यवंशीला समजावताना दिसला आहे. गौतम गंभीर वैभवला मैदानातील परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याचा सल्ला देतो आहे. आणि प्रत्येक बॉलवर जोखीम घ्यायची गरज नाही अशा शब्दात तो वैभवच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.

कारण वैभव सूर्यवंशीची बॅट इंग्लंड विरूद्ध सामन्यात अजिबात चालली नाही आहे. त्याने इंग्लंड विरूद्ध 14,13,15 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत वैभवच्या खेळीवर गौतम गंभीर नाराज दिसला. पण त्याने वैभवची समजूत काढून त्याला आत्मविश्वास दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *