Beed Crime News : बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चकलंबा पोलिसांनी कारवाई केली आहे. सुरळेगाव शिवारातील उसाच्या शेतीमध्ये केलेल्या गांजाची लागवड पोलिसांना उध्वस्त केली आहे. एकूण 48 लाख 27 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरळेगाव शिवारातील गट क्रमांक 113 मध्ये मनोज उर्फ बादल भगवान आंधळे यांच्या उसाच्या शेतात छापा टाकत ही कारवाई पोलिसांनी केली आहे. या कारवाईत गांजाची लहान-मोठी 253 झाडे आढळली ही झाडी जप्त करण्यात आली असून या झाडांचे वजन 200 किलोच्या घरात आहे.याचबरोबर चार किलो 300 ग्रॅम सुका गांजा आणि 450 ग्रॅम निमसूका गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चकलंबा पोलीस करत आहेत.
जळगावात मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची सिनेस्टाईल कारवाई; एमडी तस्करांना सापळा रचून केली अटक
जळगावात मध्यरात्री धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी तस्करांना सापळा रचून सिनेस्टाईलने अटक केली आहे. दोघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. जी.एस. ग्राऊंड परिसरात धाड टाकली आहे. 56.29 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आलं आहे. 3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री रचलेल्या सिनेस्टाईल आणि थरारक सापळ्यात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व जिल्हापेठ पोलिसांनी एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जी.एस. ग्राऊंड परिसरात ही थरारक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 56.29 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि मोटारसायकलसह एकूण3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न होताच एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. मात्र पोलिसांनी जयेश देविदास तायडे आणि हितेंद्र शिवाजी परदेशी यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. प्राथमिक चौकशीत फरार आरोपी भैय्या सोनवणे याच्याकडून विक्रीसाठी एमडी घेतल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.