व्यवहार रद्द, निष्पक्ष चौकशी अन् मोहोळांचा राजीनामा; रवींद्र धंगेकरांचं जैन बोर्डिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र, 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन करणार


Ravindra dhangekar letter to pm modi: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी चौकशी आणि राजीनाम्याची मागणी करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

Ravindra dhangekar writes letter to pm Narendra modi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद अधिकच पेटताना दिसतो आहे. आज रवींद्र धंगेकारांना त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीत बिघाड होऊ नये काय सांगायचे ते सांगितले आहे, असे म्हटले होते. परंतु याला न जुमानता रवींद्र धंगेकर यांनी आता थेट नरेंद्र मोदींनाच पत्र लिहून मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग प्रकरणी चौकशी आणि त्यांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तसेच २७ नोव्हेंबरपासून जैन बोर्डिंग याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचेही धंगेकरानी सांगितले आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ हा वाद आता केंद्रीय पातळीवर पोहोचला आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

या पत्रातून रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराची निपक्ष:पाती चौकशी व्हावी असं म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं की, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी ‘ही निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही.”
Maharashtra TimesPune News: आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये, बाहेर पडताच जैन बांधवांकडून घेराव, नेमकं काय घडलं?

२७ ऑक्टोबरपासून पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत आंदोलन

याशिवाय पुढे लिहताना धंगेकर म्हणाले आहेत की, “तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे, तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे”

मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागितला

“आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहेत. आज मी या पत्रामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहे. मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.”

वन नेशन, वन इलेक्शनसोबत वन लीडरचा नारा; भाजपची सत्ता येणार म्हणत अशोक चव्हाणांना विश्वास

पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्राची प्रत

“आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे,” असंही धंगेकरांनी पत्रात लिहिलं आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा